PHOTOS : तिच्यापुढे ऐश्वर्याही फिकी! ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये तृषा कृष्णन आली अन् भाव खाऊन गेली! By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 05:31 PM 2022-09-07T17:31:35+5:30 2022-09-07T17:55:42+5:30
Aishwarya Rai Bachchan, Trisha Krishnan At Ponniyin Selvan Trailer Launch : होय, ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये ऐश्वर्यापेक्षा साऊथ स्टार तृषा कृष्णन हीच जास्त भाव खाऊन गेली. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. ऐश्वर्या जिथे जाईल तिथे लक्ष वेधून घेते, तिचे सौंदर्य खिळवून ठेवते. पण ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये मात्र भलतंच दिसलं.
होय, ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये ऐश्वर्यापेक्षा अभिनेत्री तृषा कृष्णन हीच जास्त भाव खाऊन गेली.
या इव्हेंटमध्ये ऐश्वर्या आणि तृषा कृष्णन दोघीही हजर होत्या. अशात दोघींना पाहून सोशल मीडियावर तुलना सुरू झाली आणि यात तृषाने बाजी मारली.
तृषाच्या लुकला नेटकऱ्यांनी अधिक पसंती दिली. तिच्यापुढे ऐश्वर्या रायचा लुक एकदम फिका ठरला.
तृषाने या इव्हेंटमध्ये गुलाबी रंगाची हेवी वर्कची साडी परिधान केली होती. या साडीत ती कमालीची सुंदर दिसत होती.
याऊलट ऐश्वर्याने काळ्या रंगाचा सलवार सूट व त्याच शेडचा दुप्पटा घेतला होता. ‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी ऐश्वर्याने निवडलेल्या या आऊटफिटवरही युजर्सनी टीका केली.
ऐश्वर्याचा लुक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं. किती भयानक दिसतेय, म्हातारी झाली, प्लास्टिक सर्जरी, असं काय काय लिहून युजर्सनी ऐश्वर्याला ट्रोल केलं.
याऊलट तृषाचं सोशल मीडियावर जबरदस्त कौतुक झालं. याला म्हणतात ओरिजनल ब्युटी अशा शब्दांत अनेकांनी तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली.
‘पोन्नियन सेल्वन’च्या ट्रेलर लॉन्चचे फोटो क्षणात व्हायरल झालेत. पण यात ऐश्वर्याऐवजी तृषाचीच चर्चा अधिक झाली.