या बोल्ड जाहिरातीमुळे चर्चेत आली होती पूजा बेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 07:09 PM2020-05-11T19:09:41+5:302020-05-11T19:09:41+5:30

पूजा बेदीने तिच्या करियरच्या सुरुवातीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिला आज वाढदिवस असून तिने वयाची पन्नाशी पार केली आहे.

कबीर बेदी यांची मुलगी असलेल्या पूजाने तिच्या बोल्ड अंदाजामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

नव्वदीच्या दशकात एका कंडोमच्या जाहिरातीत काम करून पूजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

या जाहिरातीमुळे पूजा बेदी त्याकाळात चांगलीच प्रसिद्धझोतात आली होती.

अलीक पद्मसी यांनी ही जाहिरात बनवली होती.

पूजाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी जो जिता वही सिकंदर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे अधिक कौतुक झाले होते.

पूजाची कंडोमची जाहिरात खूपच बोल्ड असल्याने दूरदर्शनने ही जाहिरात दाखवण्यास मनाई केली होती.

पूजाच्या पावलावर पाऊल ठेवून तिची मुलगी आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.