Alaya Furniturewala : पूजा बेदीची लेक 'अलाया' चा बिकीनीमध्ये जलवा, आईनंतर आता लेकीचीच जास्त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:40 IST2023-02-28T12:30:02+5:302023-02-28T12:40:20+5:30
पूजा बेदीची लेक अलाया सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी हिने तिच्या बोल्ड अवताराने एक काळ गाजवला होता. मात्र ती अनेकदा प्रोफेशनल आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली. आता पूजा बेदीची लेक अलाया फर्निचरवालाही तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
अलाया नेहमीच सोशल मीडियावर कधी बोल्ड तर कधी बिकीनी लुकमधले फोटो अपलोड करत असते.
अलाया कमालीची फीट आहे हे तिच्या फोटोंवरुन लक्षात येते. अनेकदा तिने योगा करतानाचेही फोटो अपलोड केले आहेत जे बघून नेटकरीही अवाक झालेत
आता नुकतेच अलायाने बिकीनीमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार दिसून येतोय.
काळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये अलायाचा हा फारच हॉट लुक दिसत आहे.तर खांद्यावर काळ्या रंगाचे एक जॅकेटही घातले आहे.
एका मोठ्या स्पेसमध्ये टेबलवर बसून अलायाने हे फोटोशूट केलेले दिसत आहे. यामध्ये तिचा फिटनेस पाहून भलेभले सरप्राईज झाले आहेत.
अलाया केवळ २५ वर्षांची असून ती फिटनेसमुळे अनेकांनी प्रेरणा देत असते. सध्या आघाडीच्या अभिनेत्रींना अलाया नक्कीच टक्कर देणारी आहे.
अलाया लवकरच राजकुमार राव सोबत 'स्री' या सिनेमातही दिसणार आहे.
अलायाने 'जवानी जानेमन' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकतेच ती कार्तिक आर्यनसोबत 'फ्रेड्डी' या सिनेमातही दिसली.