Princess Aditi Rao Hydari Looks Like A Dream In Pink Gown As She Drops Pics From Cannes
सौंदर्यात सर्वांना मात देते प्रिन्सेस 'आदिती राव हैदरी', फोटो पाहून चाहते घायाळ! By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 05:09 PM2024-05-29T17:09:48+5:302024-05-29T17:22:01+5:30Join usJoin usNext अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत, तिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. अदिती राव हैदरी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे. नुकताच तिचा नवा लूक समोर आला, ज्यामध्ये ती अक्षरश: डिस्ने प्रिन्सेस सारखी दिसत आहे. पण, तुम्हाला माहितेय अदिती खऱ्या आयुष्यात राजकुमारी आहे. अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबादच्या राजघराण्यात झाला. तिचे आजोबा राजा जे रामेश्वर राव यांनी तेलंगणातील वानापर्थीवर राज्य केले, तर आदिती राव यांचे पणजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. आपल्या स्टाईलने सर्वांना घायाळ करणारी ही अभिनेत्री एवढ्या मोठ्या कुटुंबातील आहे, याची कल्पनाही कोणी केली नसेल. लेटेस्ट फोटोंमध्ये हलक्या गुलाबी रंगाचा हा गाऊन अदितीवर खूप खुलून दिसत होता. परफेक्ट मेकअप आणि ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला. आदितीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं.टॅग्स :आदिती राव हैदरीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाAditi Rao HyderCelebritybollywoodcinema