ब्रेकअपनंतरही प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंडसोबत झाली इंटीमेट, अभिनेत्रीचे खासगी आयुष्यातील सीक्रेट्स आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:37 PM2023-01-16T12:37:22+5:302023-01-16T12:45:24+5:30

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने तिच्या अफेअर आणि सेक्स लाईफबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. प्रियंका तिचे म्हणणे अगदी रोखठोकपणे जगासमोर मांडते आणि त्यात तिला कोणतीही लाज वाटत नाही.

प्रियांकाने तिच्या अफेअर आणि सेक्स लाईफबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.

कॉफी विथ करण सीझन ५ मधील प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये देसी गर्ल प्रियंका तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे.

कॉफी विथ करणच्या कॉफी शॉट्स राउंडमध्ये करण जोहरने प्रियंका चोप्राला बरेच वैयक्तिक प्रश्न विचारले. पीसीनेही प्रत्येक प्रश्नाला बेधडकपणेने उत्तर दिले. कोणतीही लाज न बाळगता तिने अनेक गुपिते उघडली होती.

संभाषणादरम्यान करण जोहरने प्रियांका चोप्राला विचारले की ब्रेकअपनंतर तिने कधी तिच्या एक्सला किस केले आहे का? यावर प्रियांकाने होकारार्थी उत्तर दिले.

इतकेच नाही तर करणच्या शोमध्ये प्रियांकाने फोनवर सेक्स केल्याची कबुलीही दिली होती.

करणने प्रियांकाला विचारले की, तू कधी हेडफोन सेक्स केला आहे का? यावर प्रियांकानेही होकारार्थी उत्तर दिले. त्याचवेळी करणला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने त्याचे गुपितही उघडले आणि म्हणाला- मी एकदा फोन सेक्स केला होता, तोही तेव्हा बॅटरी संपणार होती, कारण दुसरा पर्याय नव्हता.

करणने प्रियांकाला पुढे विचारले की. तिने तिच्या जोडीदारासोबत आंघोळ केली आहे का? यावर अभिनेत्रीचेही उत्तर होकारार्थी होते.

कॉफी शॉट्सच्या सेशनमध्ये प्रियंका आणि करणने स्वतःबद्दल अनेक धक्कादायक आणि बोल्ड खुलासे केले आहेत.

चाहत्यांना प्रियांकाचा स्पष्टवक्तेपणा आवडला आहे आणि ते तिला नेहमीच रिअल वागण्याचा सल्ला देत आहेत.

प्रियांका वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधताना दिसते. कामासोबतच प्रियांका तिची मुलगी आणि पती निक जोनाससोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करताना दिसते.