PHOTOS: 22 वर्षात देसी गर्ल प्रियंका चोप्राचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदलेला लूक पाहून नेटकरीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:56 PM2022-07-18T17:56:44+5:302022-07-18T18:47:24+5:30

Priyanka Chopra birthday :वयाच्या १८व्या वर्षात मिस वर्ल्ड बनली प्रियंका चोप्रामध्ये २२ वर्षांत प्रचंड बदल झाला आहे.

Happy B'day Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा ही केवळ बॉलीवूड अभिनेत्री नाही तर ती ग्लोबल स्टार बनली आहे. आज प्रियंकाची गणना केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. प्रियंका चोप्रा आज तिचा वाढदिवस साजरा करते आहे.

प्रियंकाने 2000 साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. प्रियंकाच्या डोक्यावर मिस वर्ल्डचा ताज चढला, त्यावेळी तिचे वय 18 वर्षे होते. प्रियंकाने 95 ब्युटी क्वीनला हरवून मिस वर्ल्डचा खिताब जिंकून जगभरात भारताचे नाव उंचावले होते.

प्रियंकाला मिस वर्ल्ड होऊन जवळपास 21-22 वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हापासून प्रियंकाच्या लूकमध्ये बरेच बदल पाहायला मिळाले आहेत.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा नेहमीच सुंदर असते, परंतु 2000 ते 2022 पर्यंत प्रियांकाच्या लूकमध्ये बरेच बदल झाला. ही अभिनेत्री आता पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश, बोल्ड, ग्लॅमरस झाली आहे.

प्रियंका आज अनेक तरुणींसाठी प्रेरणा बनली आहे. प्रियंका अनेक मुलींना आयुष्यात मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती साकार करण्यासाठी प्रेरित केले आहे.

प्रियंका चोप्राला ओळखणे कठीण होत असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. प्रियंकाच्या चेहऱ्यावर असलेले हसू तिची निरागसता सांगते आहे.

जुने फोटो पाहिल्यावर लक्षात येते प्रियंकामध्ये आता जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळत आहे. (Photo Instagram)

बॉलीवूडमधील अनेक हिट चित्रपट प्रियंका चोप्राच्या नावावर आहेत. तिने हॉलिवूडमध्येही आपले पाऊल ठेवले आहे. अभिनयासोबतच प्रियंका एक यशस्वी बिझनेस वुमन देखील आहे. (Photo Instagram)

(Photo Instagram)