प्रियंका चोप्राच्या घरी लगीनघाई! होणारी वहिनी 'देसी गर्ल'ला देते सौंदर्यात टक्कर, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 05:44 PM2024-08-25T17:44:13+5:302024-08-25T17:57:44+5:30

ग्लोबल आयकॉन प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा हा त्याची गर्लफ्रेंडसोबत लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतंच भारतात आली आहे. अभिनेत्री तिच्या भावाच्या लग्नासाठी भारतात आली आहे.

प्रियंका चोप्राच्या घरी लगीनघाई सुरू आहे. प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकत आहे.

सिद्धार्थ हा नीलम उपाध्याय या अभिनेत्रीसोबत लग्न करणार आहे.

नीलम आणि सिद्धार्थ यांचा गेल्या एप्रिल महिन्यामध्येच साखरपुडा पार पडला होता. त्यावेळीही प्रियंका भारतात आली होती.

प्रियंका चोप्राची होणारी वहिणी नीलम ही एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

नीलमने अनेक तेलुगू, तमिळ व हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

नीलम सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

नीलम आणि सिद्धार्थ मागच्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. यापूर्वी निलम अनेकदा चोप्रा कुटुंबियांसोबत दिसली होती.

नीलम सिद्धार्थबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.