Photos: प्रियंका चोप्राचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड लूक, फ्रान्समध्ये पती अन् लेकीसोबत केली सुट्टी एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 01:33 PM2024-09-14T13:33:07+5:302024-09-14T13:45:25+5:30

वयाच्या ४२ व्या वर्षी प्रियंकाच्या हॉटनेस वेधलं लक्ष

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत नाव कमावणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि पती निक जोनस(Nick Jonas) कपल गोल्स देतात. त्यांना मालती मेरी ही क्युट मुलगीही आहे.

अभिनेत्री प्रियंका चोप्रा वयाच्या ४२ व्या वर्षीही आपल्या ग्लॅमरस अदांनी आणि फिटनेसने सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. सध्या ती पती आणि लेकीसोबत फ्रान्समध्ये क्लॉलिटी टाईम घालवत आहे.

प्रियंकाने बीच साईड बिकीनीमध्ये फोटोशूट केलं आहे. तिची डस्की स्कीन आणि कमालीचा फिटनेस कमालीचा आहे. एकंदरच प्रियंका याही वयात तरुणींनाही तगडी कॉम्पिटिशन आहे.

एका फोटोत तिने आपली टोन्ड फिगरही फ्लॉन्ट केली आहे. यामध्ये प्रियंका उन्हात झोपली आहे. तिने ब्राऊन रंगाची बिकीनी आणि सनग्लासेस घातले आहेत. यात ती सुपरहॉट दिसत आहे.

तर आणखी एका फोटोत ती व्हाईट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. सोबतच तिने व्हाईट हॅट घातला आहे. फ्रान्समध्ये फिरताना प्रियंका तेथील समर सीझन एन्जॉय करत आहे.

भारताचे लाडके जिजू म्हणजेच निक जोनासही नेहमीप्रमाणेच हँडसम लूकमध्ये दिसत आहे. हातात गिटार घेऊन त्याने पोज दिली आहे. निक जोनास हॉलिवूडमध्ये गायक आहे.

निक आणि प्रियंकाची लेक मालती मेरीही तिच्या सुपरकूल अंदाजात दिसत आहे. मालती आईवडिलांसोबत व्हॅकेशन मोड एन्जॉय करत आहे.

प्रियंकाचे हे व्हॅकेशन फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. सध्या ती हॉलिवूडमधअये काही सिनेमांचं शूट करत आहे. लवकरच तिचे सिनेमे रिलीज होणार आहेत.