हिरव्या साडीत खुललं 'देसी गर्ल'चं सौंदर्य; प्रियांकाच्या ग्लॅमरस अदांनी चाहते 'घायाळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:28 PM2023-11-02T13:28:55+5:302023-11-02T13:36:42+5:30

प्रियांका चोप्रा ही हिरव्या रंगाच्या साडीत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.

बॉलिवूडची देसी गर्ल ते ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियंका चोप्राने बॉलिवूड नंतर हॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले.

प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक मोठे प्रोजेक्ट करत आहे. हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवल्यापासून ती क्वचितच भारतात येते.

मामी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी नुकतेच प्रियंका मुंबईत आली होती. या टूरमध्ये तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली.

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जिओ वर्ल्ड प्लाझा शॉपिंग मॉलचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात प्रियांका चोप्राही पोहचली होती.

प्रियंका कायमच तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेते. तिच्या निखळ हास्याने ती सर्वांच्या मनात जागा निर्माण करते. यावेळी तिनं हिरव्या रंगाची साडी नेसली होती.

प्रियांका चोप्राने यावेळी तिचे सुंदर काळे केस मोकळे सोडले होते आणि सिंपल मेकअप केला होता. यात प्रियांकाचा लुक खूपच युनिक आणि क्लासी वाटत होता.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच 'सिटाडेल' या वेबसिरीजमध्ये दिसली. 'लव अगेन' या हॉलिवूड सिनेमातही तिने मुख्य भूमिका साकारली.

आता ती आगामी 'हेड्स ऑफ स्टेट्स' आणि 'इट्स ऑल कमिंग बॅक टू' या सिनेमात दिसणार आहे.

तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाल्यास प्रियंका आणि निकने १ डिसेंबर, २०१८ रोजी दोघांनी जयपूरमध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला ५ वर्ष झाली असून आता त्यांना मालती मेरी नावाची गोड मुलगीही आहे.