ओहो..! तर या कारणामुळे प्रियंका चोप्राने इन्स्टावरून हटवलं ‘जोनास’ सरनेम...!! By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 02:58 PM 2021-12-22T14:58:23+5:30 2021-12-22T15:08:02+5:30
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने अलीकडे इन्स्टाग्रामवरून ‘जोनास’ हे सरनेम हटवल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पाठोपाठ प्रियंका व तिचा पती निक जोनास यांच्या बिनसल्याची चर्चाही सुरू झाली होती. प्रियंका चोप्राने अलीकडे इन्स्टाग्रामवरून ‘जोनास’ हे सरनेम हटवल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पाठोपाठ प्रियंका व तिचा पती निक जोनास यांच्या बिनसल्याची चर्चाही सुरू झाली होती.
अगदी प्रियंका व निक घटस्फोट घेणार, अशा बातम्या कानावर आल्या होत्या. प्रियंकाच्या आईने हा सगळ्या अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण प्रियंका व निक या दोघांपैकी एकानेही या बातम्या, घटस्फोटाच्या चर्चा सीरिअसली घेतल्या नव्हत्या.
प्रियंकाने तर याकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. सासरचं आडनाव का हटवलं? याचं कारण सांगण्याची तसदीही तिने घेतली नव्हती. पण आता प्रियंकाने यामागच्या कारणाचा खुलासा केला आहे.
होय, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियंकाने इन्स्टाग्रामवरून जोनास हे सरनेम का हटवलं, याचं कारण सांगितलं आहे.
सासरचं आडनाव हटल्यावर मोठा हंगामा झाला, याबद्दल काय म्हणशील? या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली,‘ मला माहित नाही. माझं युजरनेम माझ्या ट्विटर अकाऊंटशी मॅच व्हावं, फक्त इतकीच त्यावेळी माझी इच्छा होती. पण लोकांनी त्याचा इतका मोठा मुद्दा बनल्याचं पाहून मलाही आश्चर्य वाटलं.’
हा सोशल मीडिया आहे मित्रांनो, जस्ट चिल आऊट..., असंही ती म्हणाली. एकंदर काय तर सूतावरून स्वर्ग गाठू नका, असा अप्रत्यक्ष सल्लाचं तिनं लोकांना दिला.
लग्नानंतर लगेच प्रियंकाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या नावासोबत जोनास हे आडनाव जोडलं होतं. प्रियंका चोप्रा जोनास, असं ती लिहायची. पण आता त्यावर फक्त प्रियंका चोप्रा असं नाव आहे. पण आपल्याला काय? जस्ट चिल आऊट...!