द ग्रेट इंडियन म्युझिकल नाइटमध्ये ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये दिसली प्रियंका चोप्रा, निक जोनससोबत दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 11:12 AM2023-04-01T11:12:58+5:302023-04-01T11:16:18+5:30

Priyanka Chopra - Nick Jonas : ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा नुकतीच मुंबईत परतली आहे. तिने उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता यांच्या म्युझिकल लाँच इव्हेंटला पती निक जोनाससोबत हजेरी लावली.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नुकतीच मुंबईत परतली आहे. त्यानंतर अभिनेत्री उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या द ग्रेट इंडियन म्युझिकल लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली.

अभिनेत्री प्रियंका चोप्राने पती निक जोनाससोबत या कार्यक्रमात एन्ट्री केली. या भव्य पार्टीत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एका परफेक्ट कपलसारखे दिसत होते.

यासोबतच अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या ग्लॅमरस ड्रेसवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

प्रियंका चोप्रा ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग दिसत होती.

यावेळी तिच्यासोबत निक जोनसदेखील होता. त्यांच्या ग्रॅण्ड एन्ट्रीवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

प्रियंका चोप्राने पापाराझीसमोर एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.