अन् तिनं चक्क प्रियंका चोप्राला प्रपोज केलं...! ‘देसी गर्ल’नं सांगितलेला किस्सा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:56 PM2021-05-24T20:56:06+5:302021-05-24T21:04:01+5:30

PriyankaChopra : अगदी गप्पागप्पांत ती तरुणी प्रियंकाच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर तिने थेट तिला रिलेशनशीपसाठी प्रपोज केले.

प्रियंका चोप्रा आज फक्त एक बॉलिवूड स्टार नाही तर ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते.

सध्या काय तर प्रियंकाने सांगितलेला एक जुना किस्सा व्हायरल होतोय. होय, प्रियंकाच्या रिअल लाईफमधील हा किस्सा वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये खुद्द प्रियंकाने कधीकाळी हा किस्सा शेअर केला होता. किस्सा काय तर एका लेस्बियनचा.

होय, एक तरूणी प्रियंकाच्या मागे लागली होती. अगदी तिने प्रियंकाला प्रपोजही केले होते. प्रियंका एका नाईट क्लबमध्ये गेली होती. तिथे एका सुंदर तरुणीसोबत तिची ओळख झाली. बोलता बोलता दोघांमध्ये मैत्री देखील झाली.

अन् अगदी गप्पागप्पांत ती तरुणी प्रियंकाच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर तिने थेट तिला रिलेशनशीपसाठी प्रपोज केले.

एका तरूणीने अचानक प्रपोज केलेले पाहून प्रियंका काहीक्षण गोंधळली. तिला नकार कसा द्यावा, हेही तिला सुचेनासं झालं.

पण अशावेळी एक युक्ति तिच्या कामी आली. सॉरी, मी आधीच एका तरूणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, असे सांगून प्रियंकाने तिच्यापासून पिच्छा सोडवला.

प्रियंकाच्या त्या उत्तराने ती तरूणी नाराज झाली अन् उदास चेह-याने निघून गेली. इकडे प्रियंकाने सुटकेचा नि:श्वास सोडला.