ना आलिया ना दीपिका.. 'या' अभिनेत्रीनं एका सिनेमासाठी ३० कोटी घेतलंय मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:37 IST2025-01-31T16:25:24+5:302025-01-31T16:37:02+5:30

बॉलिवूडची सर्वांत महागडी अभिनेत्री कोण?

बॉलिवूडमध्ये (Bollywood) कोट्यावधी रुपयांचं मानधन घेणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. अशातच एका अभिनेत्री एका सिनेमासाठी १० नाही २० नाही तब्बल ३० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

बरं ही अभिनेत्री ना आलिया (Aalia) आहे ना दीपिका (Deepika) आणि नाही कतरिना.

या अभिनेत्रीनं बॉलिवूडमधील स्टार्स शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर सोबतही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढंच काय तर तिचं किंग खान शाहरुखसोबत लिंकअपच्याही चर्चा रंगल्या होत्या.

तर ही अभिनेत्री आहे 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा. अभिनेत्री भारतातील सर्वात जास्त महागडी अभिनेत्री ठरली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, प्रियंका ही एसएस राजामौली यांचा 'एसएसएमबी29'(Priyanka Chopra to star in SS Rajamouli's SSMB29) या चित्रपटात महेश बाबूसोबत झळकणार आहे.

या सिनेमासाठी तिनं तब्बल ३० कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

एसएस राजामौली यांच्या सिनेमातून प्रियंका चोप्रा इतक्या वर्षांनंतर हिंदी फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक करणार आहे.

'एसएसएमबी29' अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर चित्रपटात प्रियंका आणि महेश बाबूसोबत जॉन अब्राहमदेखील झळकणार आहे.

या सिनेमाची अधिकृत घोषणा कधी करणार याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.

दरम्यान, प्रियंकाची एकूण संपत्ती (Priyanka Chopra Net Worth) ६५० कोटी आहे. फक्त सिनेमेच नाही तर, इतर मार्गांनी देखील अभिनेत्री कोट्यवधी रुपयांची माया कमावते.