शाळेत जाणारा चिमुकला चाहता, अभिनेत्रीच्या घराबाहेर उभा राहायचा; दोन वर्ष तिने मुलाशी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:44 PM2024-07-18T16:44:45+5:302024-07-18T16:55:43+5:30

छोट्या मुलाने अभिनेत्रीला जे सांगितलं त्यामुळे तिला धक्काच बसला.

सेलिब्रिटी म्हणलं की त्यांचे चाहते आलेत. काही सेलिब्रिटींचे चाहते अनेकदा मर्यादा पार करतात. तेव्हा कलाकारांचीही चांगलीच पंचाईत होते. अनेकदा तर प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंतही जातं.

देसी गर्ल प्रियंका चोप्रालाही (Priyanka Chopra) असाच चाहत्याचा विचित्र अनुभव आला होता. आपल्या २४ वर्षांच्या करिअरमध्ये प्रियंकाने खूप नाव कमावलं. मिस वर्ल्डचा खिताबही पटकावला.

एका मुलाखतीत प्रियंका म्हणाली होती की, "एक छोटा मुलगा दर वीकेंडला अनेक तास माझ्या घराबाहेर उभा राहायचा. मी कारमधून कधी निघते याची वाट पाहायचाय. एक दिवस सुरक्षारक्षकाने याबद्दल सांगितलं. तेव्हा मी त्याला बोलावलं आणि विचारपूस केली."

तो मुलगा प्रियंकाला म्हणाला की त्याला तिच्यासारखं बनायचं आहे आणि तिच्यासोबत फिरायचं आहे. हे ऐकून प्रियंका शॉक झाली होती. प्रियंकाने त्याच्या कुटुंबियांना फोन केला आणि हे सर्व सांगितलं. त्याला पुन्हा शाळेत पाठवण्यात आलं.

प्रियंका चोप्रा स्टार अभिनेत्री असली तरी खूप दिलदार आहे. या घटनेनंतर ती २ वर्ष त्या मुलाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात होती.

आज पीसी 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. पती निक जोनासने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. त्यांना मालती मेरी ही गोंडस मुलगीही आहे.

प्रियंका नेहमी आपल्या कुटुंबासोबत व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असते. पीसीचे आता केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर ती सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री आहे. तिचे तब्बल 91.6 फॉलोअर्स आहेत.