आलिशान पॅलेसपेक्षा कमी नाही Priyanka Chopraचं लॉस अँजेलिसमधलं घर, पाहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 05:27 PM2022-11-08T17:27:10+5:302022-11-08T17:33:16+5:30

Priyanka Chopra : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव कमावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. तीन वर्षांनंतर ती भारतात परतली आहे. त्यानंतर तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत नाव कमावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. तीन वर्षांनंतर ती तिच्या माहेरी म्हणजेच भारतात परतली आहे. त्यानंतर तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

प्रियांका चोप्राच्या लॉस अँजेसिलमधील घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो प्रियांका चोप्राच्या घरातील लिव्हिंग रुमचे आहे. जे खूपच छान दिसते.

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घराची लिव्हिंग रूम जितकी मोठी आहे तितकीच ती बघायला अप्रतिम दिसते. त्यांच्या घराचा हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या फोटोत अभिनेत्री तिच्या घराबाहेरील एरियात दिसत आहे. या फोटोवरून प्रियांका चोप्राचे घर किती मोठे आहे याचा अंदाज लावता येतो.

प्रियंका चोप्राच्या घरात एक स्विमिंग पूलही आहे. निक जोनास त्याच स्विमिंग पूलजवळ बसलेला दिसत आहे.

या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा स्विंग करताना दिसत आहे. त्याच्या घरात स्विमिंग पूल तसेच झोपाळा आहे.

स्विमिंग पूल व्यतिरिक्त एक जिम देखील आहे. या फोटोमध्ये निक जोनास त्याच्या घरच्या जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे.

प्रियांका चोप्राच्या घरासोबतच तिचा पार्किंग एरियाही खूप मोठा आहे. या फोटोमध्ये प्रियांका चोप्रा या पार्किंग एरियामध्ये निक जोनाससोबत मस्ती करताना दिसत आहे.

पार्किंग एरियानंतर आता प्रियांका चोप्राच्या किचनचा हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये प्रियांका तिच्या स्वयंपाकघरात काम करताना दिसत आहे.

प्रियंका चोप्राच्या घराची सजावट छोट्या छोट्या गोष्टींनी करण्यात आली आहे.