तीन मुलींची आई तरी कमालीची फीट, वयाच्या ४३ व्या वर्षीही फिल्म इंडस्ट्रीतली नंबर वन अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 12:29 PM2024-07-30T12:29:03+5:302024-07-30T13:02:06+5:30

अभिनेत्रीच नाही तर दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनही मिळालं यश, फिटनेस आणि सौंदर्यात तर कोणीच हात धरु शकत नाही. हिच्यापुढे करीनाही पडेल फिकी.

फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चाळीशी, पन्नाशीतही कमालीच्या फीट आहेत. त्यांच्याकडे बघून वयाचा अंदाजही लागणार नाही. शिवाय काही तर दोन मुलांच्या आईही आहेत.

अशीच एक अभिनेत्री जी बॉलिवू़ड नाही तर पंजाबी इंडस्ट्रीतली आहे. तीन मुलींच्या जन्मानंतरही ती कमालीची फीट आणि सुंदर दिसते. तिच्या सौंदर्यावर चाहते घायाळ आहेत.

ही अभिनेत्री आहे नीरु बाजवा. नीरु केवळ अभिनेत्री नाही तर दिग्दर्शिका आणि निर्मातीही आहे. तिचा जन्म कॅनडात झाला आणि तिथेच तिने शिक्षण घेतलं.

भारतात आल्यानंतर तिने सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं. सुरुवातीला हिंदी इंडस्ट्रीत काम केल्यानंतर ती आज पंजाबी सिनेजगतात टॉपला आहे.

1998 साली तिने 'मै सोलह बरस की' मधून पदार्पण केलं. 2004 साली पंजाबी इंडस्ट्रीकडे वळली. 'हीरे हीरे' या म्युझिक अल्बमनंतर ती रातोरात फेमस झाली. पंजाबी इंडस्ट्रीतील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत तिने काम केलं आहे.

नीरु सध्या ४३ वर्षांची आहे. मात्र तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाजही येत नाही. नीरुने 2015 साली हॅरी जवंधासोबत लग्नगाठ बांधली. त्याचवर्षी तिने गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 2020 साली तिला जुळ्या मुली झाल्या.

तीन मुलींची आई असूनही नीरुने आपली फिगर मेंटेन ठेवली आहे. ती कमालीची ग्लॅमरसही आहे. अनेक महिलांसाठी ती आदर्श आहे.

नीरु सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असून कुटुंबासोबत फोटो शेअर करत असते. तिच्या मुली खूपच क्युट आहेत.

नीरुचा नुकताच आगामी 'जट अँड ज्यूलिएट 3' सिनेमा रिलीज झाला. यामध्ये ती पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझसोबत झळकली.