IN PICS : ‘पुष्पा’ रिलीज झाला, सुपरडुपर हिट झाला, पण अल्लू अर्जुनला आजही होतोय 'हा' त्रास...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 03:03 PM2022-01-03T15:03:20+5:302022-01-03T15:18:03+5:30

Pushpa The Rise : ते दोन -अडीच तासांचं काम नव्हतं, तर त्यामागे दोन वर्षांची मेहनत होती... वाचा काय म्हणाला अल्लू अर्जुन

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा- द राइज’ हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करतोय. जगभरात या चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवलायं आणि अजूनही कमाई सुरूच आहे.

या चित्रपटात अल्लू अजुर्नच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. त्याचा अभिनय, त्याची चित्रपटातील बॉडी लँग्वेज, त्याच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत. पण हे सगळं सोप्प नव्हतं.

म्हणायला सिनेमा अडीच तासांचा होता. पण या अडीच तासांमागे अल्लूची प्रचंड मेहनत होती. चित्रपट साईन केला तेव्हाच, या चित्रपटासाठी तुला काहीतरी खास करावं लागेल, याची कल्पना दिग्दर्शकाने अल्लू अर्जुनला दिली होती.

हे खास काय तर खांदा उचलण्याची एक विशिष्ट पद्धत. तीन चार कल्पानांपैकी खांदा थोडा वर ठेवणं ही कल्पना दिग्दर्शकाला आवडली. हे जरा जास्त हिरोगिरी करण्यासारखं वाटत असल्यानं अल्लू चित्रपटात असाच वावरला. पण हे करताना अल्लू अर्जुनच्या अक्षरश: नाकीनऊ आलं होतं.

होय, दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत तो यावर बोलला. तो म्हणाला, एक खांदा थोडा वर उचलून चालणं, वागणं ही माझी चित्रपटातील युनिक स्टाईल लोकांना खूप आवडली. पण हे करणं सोप्प नव्हतं. दोन वर्ष मी याची प्रॅक्टिस केली. माझा खांदा आजही दुखतो. आजही मला त्रास होतो.

पुष्पा हा चित्रपट गतवर्षी 17 डिसेंबरला रिलीज झाला आणि 2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अद्यापही हा सिनेमा गर्दी खेचतोय.

या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरात जवळपास 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 56.69 कोटींची कमाई केली आहे. हा आकडा 75 कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज आहे.