केवळ व्हिसा मिळावा म्हणून अभिनेत्रीने घातला होता लग्नाचा घाट, स्वतःच दिली होती कबुली By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:51 PM 2021-04-13T12:51:39+5:30 2021-04-13T12:56:41+5:30
Radhika Apte reveals why she married Benedict Taylor :प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो.लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते.प्रत्येकासाठी हा खास क्षण असतो. मात्र बॉलिवूडमध्ये कलाकारांसाठी लग्न केवळ एक तडजोड असते. बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेने काही महिन्यांपूर्वी तिच्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
यावेळी तिने जे काही सांगितले यावर कोणालाही विश्वास बसला नाही.
मात्र ती जे काही बोलली तेही तितकेच खरे होते.
यापूर्वी कधीच राधिकाने तिच्या लग्नाविषयी मनमोकळेपणाने बोलली नव्हती.
लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केल्याचे राधिकाने म्हटले होते.
राधिका आपटेने 2012मध्ये लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे.
राधिकाला अनेकवेळा तिने हे लॉन्ग डिस्टेंस लग्न का केले असा प्रश्न विचारण्यात आला ? अखेर याचं खरं कारण तिने सांगितलं.
राधिका म्हणाली 2012मध्ये तिला इंग्लंडचा सहज व्हिसाची आवश्यकता होती.
राधिका सांगते, त्यावेळी इंग्लंडचा व्हिसा मिळणं खूप कठीण होते म्हणून तिने संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले.
तिचा लग्नसंस्थेवरही विश्वास नसल्याचे तिने स्पष्ट केले होते.