'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 21:04 IST2020-05-26T21:04:13+5:302020-05-26T21:04:13+5:30

अभिनेत्री करिश्मा शर्मा तिच्या ग्लॅमरस व स्टायलिश अदांसाठी प्रसिद्ध आहेत.
नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
करिश्मा शर्माने फोटो पोस्ट केला आहे ज्यात तिच्या अंडरआर्म्समधील केस दिसत आहेत.
करिश्माने फोटो पोस्ट करत लिहिले की, हो माझ्या अंडरआर्म्समध्ये हेअर आहेत मला त्याने काहीच फरक पडत नाही.
करिश्माचा हा फोटो खूप व्हायरल होत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कित्येक युजर्सने करिश्माची मस्करी केली आहे. तर काहींनी ट्रोल केले आहे.
वेबसीरिज रागिनी एमएमएस रिटर्न्ससोबत करिश्माने काही हिट सिनेमांमध्ये काम केले आहे.
याशिवाय करिश्माने काही म्युझिक अल्बममध्येदेखील काम केले आहे.