"तरच भेटायला जाईन", करिश्माचा जन्म झाल्यावर तिला भेटण्यासाठी राज कपूर यांनी ठेवलेली अट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 04:25 PM2024-09-22T16:25:12+5:302024-09-22T16:39:01+5:30

करिश्मा कपूर हिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. तिच्या जन्मावेळी राज कपूर यांनी एक अट ठेवली होती. ज्याची चर्चा आजही होते.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

करिश्मा ही शो मॅन नावाने प्रसिध्द बॉलिवूड अभिनेते राजकपूर यांची नात आहे.

करिश्माचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता यांनीसुध्दा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे.

करिश्माला तिचे मित्र-मैत्रीणी आणि कुटुंबीय प्रेमाने 'लोलो' नावाने म्हणतात.

करिश्माने 'राजा हिंदुस्तानी' 'जिगर', 'राजा बाबू', 'सुहाग', 'कुली नं. 1', 'गोपी किशन', 'साजन चले ससुराल' आणि 'जीत'सारखे अनेक सुपरस्टार सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत.

करिश्मा ही बालपणीपासून आपल्या आई-वडिलांची लाडकी आहे. तिचे दादा दिवंगत राजकपूर हेसुध्दा तिचे खूप लाड करत होते.

करिश्माचा जन्म हा 25 जून 1947 रोजी मुंबईमध्ये ब्रीच कँडी रुग्णालयात झाला होता. पण, तुम्हाला माहितेय जेव्हा करिश्मा जन्म झाला होता, तेव्हा तिला रुग्णालयात भेटण्यापूर्वी राज कपूर यांनी एक अट ठेवली होती.

ते म्हणाले होते की नातीचे डोळे निळे असतील तेव्हाच तिला भेटायला रुग्णालयात जाईन. याचा उल्लेख करिश्माची आई बबिता यांनी राज कपूर द वन अँड ओन्ली शोमॅनमध्ये केला.

बबिता यांनी सांगितलं, "लोलोचा जन्म झाला तो दिवस आठवतो. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत होते. पण माझे सासरे तिथे नव्हते. मुलीचे डोळे निळे असतील तरच रुग्णालयात येईल, असे त्यांनी सांगितले होते. आणि देवाच्या कृपने लोलोचे डोळे माझ्या सासऱ्यासारखे खोल निळे होते".

राज कपूर यांचे १९८८ मध्ये वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले होते.