Rakhi Sawant : "मला तलाक देऊन आदिल इराणी मुलीशी लग्न करणार अन्..."; राखी सावंतचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 05:04 PM2023-03-01T17:04:22+5:302023-03-01T17:29:57+5:30

Rakhi Sawant : राखीने आता पती आदिल दुर्रानीबद्दल एक नवीन खुलासा केला आहे जो खूपच धक्कादायक आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राखी स्वतःशी संबंधित प्रत्येक अपडेट मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसत आहे.

राखीने आता तिचा पती आदिल दुर्रानीबद्दल एक नवीन खुलासा केला आहे जो खूपच धक्कादायक आहे. राखी सावंतने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह येत या प्रकरणाशी संबंधित अपडेट्स शेअर केले. आईच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.

राखी म्हणाली, "आदिलने इराणी मुलीला भेटण्यासाठी बोलावलं जिने त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आदिलने तर हे ही सांगितलं होतं की मला तलाक देऊन तिच्याशी लग्न करणार आहे. यासोबतच आदिलने केस मागे घेण्यास सांगितले."

राखीने पुढे सांगितले की, आदिलने मला पोलीस ठाण्यात बोलावले आणि मी सर्व मुलींना सोडून फक्त तुझ्यासोबतच सेटल होईन असे सांगितले. त्यावर राखी भडकली. तिने "आदिल तू मूर्ख आहेस, तू खूप चुकीचे करतोस. तू प्रत्येक स्त्रीला हेच म्हणतोस."

"तू आता तुरुंगात पोहोचला आहेस त्यामुळे तुझ्या पत्नीसह इतर महिलांना मूर्ख बनवणं थांबवं. कोणती मुलगी तुझ्याशी लग्न करेल का... ती कशी करेल...? मी तलाक देणार नाही... तुझं लग्न कसं होणार? तसं केल्यास मी तुझ्यावर माझी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करेन."

"तू माझ्याशी फक्त निकाह केला नाहीस... कोर्ट मॅरेजही केलं आहेस. आदिल, किती त्रास देणार आहेस? मारून टाकणार आहेस का? माझ्या हृदयाचा तू खून केला आहेस आता आयुष्याचाही करणार आहेस का? तू मला मानसिक आणि शारीरीक, आर्थिक ... सर्वत्र उद्ध्वस्त केले आहेस."

"मला माझ्या आईचा आणि देवाचा आशीर्वाद आहे... तू मला जितकं पाडशील तितकीच मी उठेन... सकाळी उठून मी नमाज वाचते." याशिवाय राखीने सांगितले की ती ओशिवरा पोलिसांच्या तपासावर नाराज आहे.

"ओशिवरा पोलिसांनी माझी एक केस सोडवली असती... त्यांनी माझे बँक स्टेटमेंट आणि माझ्या पैशांची चौकशी केली नाही याचे मला वाईट वाटते. त्यांनी काही केले नाही... माझा फोन शोधूनही आणला नाहीस... कोर्टात त्याच्याविरुद्ध पुरावाही सादर केला नाही."

"माझ्यासारख्या सेलिब्रिटीला तुम्ही न्याय देऊ शकला नाही, तर सामान्य माणसाला काय देऊ शकणार आहात? प्रत्येक माणसाला... मग तो खाकी असो वा खादी... त्रास सहन करावा लागतो... देव माझ्यासाठी पुरावा घेऊन येईल" असंही राखी सावंतने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील खटके दिवसेंदिवस वाढत आहेत. आदिलच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि पोलिसांत तक्रार देण्यासाठी राखी शर्लिन चोप्रासोबत म्हैसूरला पोहोचली होती. म्हैसूरला पोहोचल्यानंतर राखी सावंतने आदिलची एक्स गर्लफ्रेंड रोशिनाची देखील भेट घेतली.

राखीने सांगितले की, तिला आदिलचं सत्य कळलं की, "तो व्यवसायाने ड्रायव्हर आहे. बायसेक्शुअल आहे, डोक्यावर केस नाहीत. झोपडपट्टीत राहतो". राखीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हे सर्व सांगितले आहे.

"आदिल खानच्या डोक्यावर केस नाहीत, हे मला माहीत नव्हतं. त्याला टक्कल आहे, याची माहिती मला हेअर अँड स्कीन फॅक्टरीने दिली आहे. हे ऐकून मला धक्का बसला आहे. तो बायसेक्शुअल आहे, हेही मला समजलं आहे. त्याचा एक न्यूड व्हिडीओही काहीच दिवसांपूर्वी मी पाहिला. खूप घाणेरडा व्हिडीओ होता" असं राखीने म्हटलं आहे.

आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रामा क्वीनचा नवरा तुरुंगात आहे. याच दरम्यान, आता राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ड्रामा क्वीन नववधू दिसत आहे.

राखी सावंतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ड्रामा क्वीनला नववधूच्या वेषात पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. राखी पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

राखीने पुन्हा लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, ती केवळ शूटिंगसाठी वधू बनली आहे. व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसत आहे, "मी एकदाच लग्न केले आहे, पुन्हा कधीच नाही. मला आयुष्यात पुन्हा लग्नाचा पोशाख घालायचा नाही." आदिलबद्दल बोलताना ती म्हणाली, "माझा एकच नवरा आहे, तो तुरुंगात आहे."