Rakhi Sawant : "मला एक संधी दे…" जेलमध्ये असलेल्या आदिलने राखीला केला फोन; अभिनेत्रीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 10:25 AM2023-03-09T10:25:09+5:302023-03-09T10:41:58+5:30

Rakhi Sawant And Adil Khan : राखीने आता आदिल खानबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहेत. जेलमधून आदिल तिला फोन आणि मेसेज करत असल्याचं म्हटलं आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंतच्या (Rakhi Sawant) वैवाहिक आयुष्यात खळबळ उडाली आहे. सातत्याने नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. राखीने पती आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याच्यावर मारहाण आणि फसवणुकीचा गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी त्यानंतर आदिल खानला अटक करून तुरुंगात पाठवले. याच दरम्यान, राखीने आता आदिल खानबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहेत. जेलमधून आदिल तिला फोन आणि मेसेज करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच तो राखीला आणखी एक संधी दे असंही सांगत आहे.

विरल भय्यानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राखीने आदिलबाबत खुलासा केला. "आदिल मला जेलमधून फोन करतोय, मेसेज करतोय आणि विनंती करत आहे. मला तुझ्याबरोबर संसार करायचा आहे. मला परत यायचं, मला एक संधी दे" असं म्हणत असल्याचं राखीने सांगितलं.

राखीने त्याला उत्तर दिलं आहे. "आदिल ज्यावेळी मी तुझ्या पाया पडून सांगत होते की, जान तू घरी परत ये, तेव्हा तू माझे काहीही ऐकलं नाही आणि आता तू मला विनवणी करतोस. पण नाही, हे पुन्हा शक्य नाही" असंही राखीने म्हटलं आहे.

अभिनेत्रीने दुबईमध्ये तिची डान्स एकॅडमी उघडली आहे. एअरपोर्टवर पापाराझींसोबतच्या संभाषणात राखीने खुलासा केला की तिला दुबईत नवीन घर आणि कार मिळाली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, तिने पती आदिल खान दुर्रानी याच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला होता ते ठिकाण पाहून प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री भावूक झाली.

काही छायाचित्रकारांनी तिला होळीच्या दिवशी तिच्या चाहत्यांसाठी एक संदेश शेअर करण्यास सांगितले, राखीने चाहत्यांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद आणि रंग भरावेत अशी शुभेच्छा दिल्या, पण पुढे म्हणाली, "माझ्या आयुष्यातील रंग संपले आहेत."

राखी सावंत एअरपोर्टवर ब्लॅक जिम वेअरमध्ये दिसली होती. पापाराझीसमोर, अभिनेत्री तिची दिवंगत आई आणि आदिलबद्दल बोलली आणि भावूक झाली. राखीचा हा व्हिडीओ प्रसिद्ध फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, ती दुबईमध्ये तिची डान्स एकॅडमी सुरू करण्याबद्दल बोलत आहे.

राखी म्हणते, "तिथे एक घर घेतलं आहे. गाडी घेतली, माझ्या कंपनीने मला ते दिलं आहे. पण ती मध्येच थांबली आणि गेल्या वर्षी जुलैमध्ये आदिलवर जिथे गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला होता त्या जागेकडे लक्ष वेधून ती रडली. आदिलने प्रेयसीला सांगितलं की हे सर्व नाटक आहे.

राखीने Etimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आदिलने माझे न्यूड व्हिडीओ बनवले आणि लोकांना विकले. माझे प्रकरण सायबर क्राइम विभागाकडे आहे. राखीने आदिलबद्दल असेही सांगितले की, तो तिसऱ्यांदा त्याची गर्लफ्रेंड तनूसोबत लग्न करण्याचा विचार करत आहे.

"आदिलने माझा छळ करून माझी फसवणूक केली आहे. त्याला जामीन मिळावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी माझे बँक स्टेटमेंट पोलिसांना दिले आहे. आदिलने माझा ओटीपी घेतला आणि माझे पैसेही चोरले, त्याने माझा विश्वास तोडला आहे."

दुसरीकडे राखीच्या वकिलांनी सांगितले की, आमच्याकडे असे गंभीर पुरावे आहेत की आदिलला जामीन मिळणार नाही. दीड कोटींची फसवणूक हा मोठा गुन्हा असून या प्रकरणाची न्यायालयातही चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा आहे.

राखीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, आदिलने तिचे दागिने चोरले आणि तिचे पैसेही खाल्ले. राखीनेही तिच्या आईच्या मृत्यूसाठी आदिलला जबाबदार धरले. तिने सांगितले की, मराठी बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी त्याने आदिलला दहा लाखांचा चेक दिला होता, तिच्या आईवर शस्त्रक्रिया करावी लागली, पण आदिलने ते पैसे आपल्या आईच्या उपचारासाठी खर्च केले नाहीत, त्यामुळे आईचा मृत्यू झाला.