Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Property Know Net worth Details
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण? By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 05:01 PM2024-02-21T17:01:19+5:302024-02-21T17:28:00+5:30Join usJoin usNext रकुल की जॅकी दोघांच्यात कोण श्रीमंत आहे? बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी आज (२१ फेब्रुवारी) विवाहबंधनात अडकले आहेत. गोव्यात पारंपरिक शीख आनंद कारंज सेरेमनी पद्धतीने त्यांचा लग्नसोहळा पार पडला. गेल्या काही वर्षांपासून जॅकी आणि रकुल एकमेकांना डेट करत होते. त्यानिमित्ताने आज कुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्यात सर्वात जास्त श्रीमंत कोण हे जाणून घेऊया. जॅकी भगनानी हा सुप्रसिद्ध निर्माता वासू भगनानी यांचा मुलगा आहे. वासू भगनानी यांनी गोविंदाच्या 'कुली नंबर 1' या चित्रपटात निर्माता म्हणून काम केलं होतं. जॅकी भगनानीचा जन्म 25 डिसेंबर 1984 रोजी कोलकाता येथे झाला. जॅकी भगनानी लहानपणापासूनच फिल्मी वातावरणात वाढला. जॅकीने 2001 मध्ये आलेल्या 'रेहना है तेरे दिल में' चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले होते. 2009 मध्ये जॅकी भगनानीने 'कल किसने देखा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाची निर्मिती त्याचे वडील वासू भगनानी यांनी केली होत. परंतु त्यांच्या मुलाचा पहिला चित्रपट पडद्यावर फ्लॉप झाला. 21 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ 7 कोटींची कमाई करू शकला. यानंतर जॅकीने 2011 मध्ये 'फालतू' चित्रपटातून पुन्हा एकदा डेब्यू केला. पण हा चित्रपटही काही विशेष करू शकला नाही. तब्बल 9 चित्रपटांमध्ये जॅकीने काम केले. पण, ते सर्व सिनेमे फ्लॉप ठरले. जॅकी भगनानी शेवटचा 2018 साली 'मित्रों' चित्रपटात दिसला होता. यानंतर जॅकीने बॉलीवूडमध्ये हिरो म्हणून काम करण्यास बंद केलं आणि वडिलांप्रमाणे निर्माता बनून नशीब आजमावलं. आज तो प्रसिद्ध निर्मात्यांच्या यादीत सामील झाला आहे. त्यामुळे तो त्याच्या चित्रपटांमधून करोडो रुपये कमावतो. अक्षय कुमार आणि टायगर श्राफ यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट जॅकी भगनानी निर्मित आहे. हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार, जॅकीची कमाई 35 कोटी रुपये आहे. तर अभिनेत्री रकुलची कमाई जॅकीपेक्षा जास्त आहे. रकुल प्रीतबद्दल बोलायचं झाल्यास तिची संपत्ती ४९ कोटी रुपये आहे. रकुल ही जॅकीपेक्षा श्रीमंत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या 'गिल्ली' या कन्नड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या रकुलने साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत स्वत:चे नाव कमावलं आहे. रकुल प्रीत सिंगने 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'यारियां' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि मेहनतीच्या बळावर आज ती टॉपची अभिनेत्री बनली आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत तिने केवळ नाव आणि लोकप्रियताच कमावली नाही. तर त्यासोबतच भरपूर पैसाही कमावला आहे. लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार, रकुलची संपत्ती 49 कोटी रुपये आहे. रकुल अनेक ब्रँडच्या जाहिराती करते. यातूनही ती पैसा कमावते. मुंबईतील वांद्रे येथे तिचे स्वतःचे घर आहे. याशिवाय, हैदराबादच्या जुबली हिल्समध्ये तिचा 3BHK फ्लॅट असल्याचे म्हटले आहे ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे. रकुललाही गाड्यांची खूप आवड आहे. तिच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएलई, रेंज रोव्हर (स्पोर्ट्स), BMW 520D अशा महागड्या गाड्या आहेत.टॅग्स :रकुल प्रीत सिंगजॅकी भगनानीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाRakul Preet Singhjackky bhagnaniCelebritybollywoodcinema