'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला आता ओळखणं झालंय कठीण, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 07:00 AM2022-12-11T07:00:00+5:302022-12-11T07:00:00+5:30

Mandakini : ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटात धबधब्याखाली पांढऱ्या साडीत भिजलेल्या मंदाकिनीचा चेहरा आजही चाहत्यांच्या मनात घर करून कायम आहे.

राज कपूर यांचा ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे.

या चित्रपटात धबधब्याखाली पांढऱ्या साडीत भिजलेल्या मंदाकिनीचा चेहरा आजही चाहत्यांच्या मनात घर करून कायम आहे.

पण मंदाकिनी कुठे आहे? आता कशी दिसते? असे असंख्य प्रश्न तुम्हाला पडले असतील ना. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

अभिनेत्री बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून लांब होती.

नुकतेच मंदाकिनीने पुन्हा सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले आहे. मात्र आता मंदाकिनीमध्ये खूप बदल झाला असून ओळखणंदेखील खूप कठीण झाले आहे.

अभिनेत्री मंदाकिनी 'मा ओ मा' या म्युझिक व्हिडीओतून सिनेइंडस्ट्रीत कमबॅक केले आहे.

या गाण्यात मंदाकिनीसोबत तिचा मुलगा रबिल ठाकूरही झळकला आहे.

मंदाकिनी आजही तिच्या लोकप्रिय चित्रपट राम तेरी गंगा मैलीसाठी ओळखली जाते.

मंदाकिनीने या चित्रपटात इतकं उत्तम काम केलं की आजपर्यंत लोक तिची आठवण काढतात. तिला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.