'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीनं केलं सिनेइंडस्ट्रीत कमबॅक, आता ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:30 PM2022-08-25T19:30:31+5:302022-08-25T19:33:11+5:30

Mandakini : १९९५ साली रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या पहिल्या चित्रपटासाठी आजपर्यंत सर्वांच्या स्मरणात राहिलेली अभिनेत्री मंदाकिनी २६ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत परतली आहे.

१९९५ साली रिलीज झालेल्या राम तेरी गंगा मैली या पहिल्या चित्रपटासाठी आजपर्यंत सर्वांच्या स्मरणात राहिलेली अभिनेत्री मंदाकिनी २६ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत परतली आहे.

पण यावेळी मोठ्या पडद्यावर नाही तर एका म्युझिक व्हिडिओ अल्बममध्ये. हा तिचा म्युझिक व्हिडिओ आहे, माँ ओ मा. या व्हिडिओमध्ये ती तिचा मुलगा रब्बील ठाकूर, अभिनेत्री बबिता बॅनर्जी आणि दोन बाल कलाकारांसोबत दिसत आहे. हा म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे.

दिग्दर्शक राज कपूर यांनी मंदाकिनीवर चित्रित केलेल्या दृश्यांमुळे राम तेरी गंगा मैली हा चित्रपट आजही चर्चेत आहे. त्या काळात मंदाकिनीवर चित्रित केलेली दृश्ये खूपच बोल्ड होती.

मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये पाच-सहा वर्षे काम केले. यानंतर तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले. ती इंडस्ट्रीपासून दूर गेली.

काही वर्षांनी तिने बॉलिवूड सोडलं आणि लग्न करून संसार थाटला.

मंदाकिनीचा लूक आधीपेक्षा आता खूप बदलला आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.

लोक आजही मंदाकिनीच्या सौंदर्याचे फॅन आहेत. आजही मंदाकिनी ५८ वर्षांची होऊनही ग्रेसफुल आणि फिट दिसते.