-आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, शिवगामीच्या आयुष्यातला इंटरेस्टिंग किस्सा By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 05:55 PM 2022-09-15T17:55:58+5:30 2022-09-15T18:05:45+5:30
Ramya Krishnan Birthday : ‘बाहुबली’ या चित्रपटातील भाव खाऊन गेलेली शिवगामी देवी अर्थात ही भूमिका साकारणारी साऊथ सुपरस्टार राम्या कृष्णन हिचा आज वाढदिवस. राम्या आज 52 वा वाढदिवस साजरा करतेय. ‘बाहुबली’ या चित्रपटातील भाव खाऊन गेलेली शिवगामी देवी अर्थात ही भूमिका साकारणारी साऊथ सुपरस्टार राम्या कृष्णन हिचा आज वाढदिवस. राम्या आज 52 वा वाढदिवस साजरा करतेय.
15 सप्टेंबर 1970 रोजी जन्मलेली राम्या साऊथ सिनेमातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्येही तिने काम केलं.
राम्याच्या अदाकारीवर सगळेच फिदा आहेत. आजही दिग्गज निर्माते-दिग्दर्शक राम्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. पण एका व्यक्तीने मात्र राम्यासोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली आहे.
होय, ही व्यक्ती अन्य कुणी नसून राम्याचा पती व साऊथचा दिग्गज दिग्दर्शक कृष्णा वामसी आहे. कृष्णा यांनी राम्यासोबत एक सिनेमा केला आणि यानंतर तिच्यासोबत कधीच काम न करण्याची जणू शपथ घेतली.
राम्याने तेलगू दिग्दर्शक कृष्णा वामसीसोबत लग्न केलं. त्याआधी दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं होतं. याचदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर असं काही घडलं की, कृष्णा यांनी राम्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला.
खुद्द राम्याने एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. इच्छा असूनही मी पतीसोबत काम करू शकत नाही. तो मला कधीच त्याच्या सिनेमात घेणार नाही. त्यामागे एक कारण आहे, असं ती म्हणाली होती.
तिने सांगितलं होत की, लग्नानंतर लगेच मी कृष्णाच्या एका सिनेमात काम करत होते. यात माझा गेस्ट रोल होता. कृष्णा मला डायलॉग द्यायचा आणि मी हसायला लागायचे. कृष्णा गंभीर वृत्तीचा दिग्दर्शक होता. त्याला हे कसं सहन होणार?
मी हसतेय हे पाहून तो भयंकर चिडला आणि यापुढे तुला कधीच साईन करणार नाही, तुला कधीच डायरेक्ट करणार नाही, अशी त्याने शपथच घेतली. त्यामुळे मी पुन्हा कधीच त्याच्यासोबत काम करू शकले नाही, असं राम्याने सांगितलं होतं.
राम्याने हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये 200 हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. पण बाहुबलीने तिला जी ओळख दिली, ती अन्य कुठल्याही चित्रपटाने नाही.
बॉलिवूडमध्ये राम्याला खास यश मिळाले नाही. पण बोल्ड अंदाजामुळे ती कायम चर्चेत राहिली़ ‘परंपरा’ या चित्रपटात स्वत:पेक्षा 24 वर्षे मोठ्या विनोद खन्ना यांच्यासोबत लिपलॉक सीन करून तिने खळबळ निर्माण केली होती.