Ranbir Alia Wedding: लग्नात पिंक साडीत दिसली करीना, तर नवाबी अंदाजात दिसला सैफ, पाहा वऱ्हाडी मंडळींचा शाही थाट By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 05:54 PM 2022-04-14T17:54:17+5:30 2022-04-14T18:24:49+5:30
Ranbir Alia Wedding: आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आज १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. पाली हिल येथील 'वास्तू' या घरी दोघांनी सात फेरे घेतले आहेत. लग्नाला सुमारे ५० पाहुणे येण्याची शक्यता आहे. यात कपूर कुटुंब आणि भट कुटुंब सहभागी होणार आहे. या दोघांच्या लग्नासाठी 'वास्तू'मध्ये पाहुण्यांचे आगमन होत आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर आज १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. पाली हिल येथील 'वास्तू' या घरी दोघांनी सात फेरे घेतले आहेत. या दोघांच्या लग्नासाठी 'वास्तू'मध्ये पाहुण्यांचे आगमन होत आहे. सोनी राजदानने आलिया भटच्या लग्नात पीच रंगाची ठिपके असलेली साडी नेसली आहे. कपाळावर लाल बिंदी लावली आहे, कुंदनचे दागिने घातलेत. न्यूड मेकअप केला आहे आणि गुलाबी लिपस्टिकने लूक पूर्ण केला आहे.
नीतू कपूरने गुजराती शैलीची साडी बांधली आहे. राजस्थानी वर्क आणि प्रिंट साडी मल्टी कलर लाँग ब्लाउजसह परिधान केला आहे.,रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने गोल्डन कलरचा हेवी वर्क लेहेंगा परिधान केला आहे.
बहीण आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नासाठी पूजा भट वडील महेश भट्टसोबत पोहोचली आहे.
आलियाची बहिण शाहीन भटने तिचा लूक अगदी साधा ठेवला आहे. न्यूड मेकअप आणि गुलाबी लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केला.
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी चित्रपट निर्माते लव रंजनही पोहोचले आहेत. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती.
आलिया भटची जवळची मैत्रीण आकांक्षा रंजनने गोल्डन हेवी वर्क बॉर्डर असलेली ग्रीन सेल्फ प्रिंटेड साडी घातली आहे. यासोबतच आकांक्षाने फुल स्लीव्हचा ब्लाउज घातला आहे.
करण जोहरनेही गुलाबी रंगाची हेवी वर्क शेरवानी घातली आहे. लुक सिंपल ठेवला आहे.
करीनाने पिंक रंगाची नेट साडी परिधान केली आहे. सैफ अली खानदेखील नवाबी अंदाजात दिसला.
लग्नातील करिश्मा, करीना आणि करण जोहरचा फोटोदेखील समोर आला आहे.
आलिया-रणबीरच्या लग्नाला श्वेता बच्चनची मुलगी नव्या नंदाही पोहोचली आहे. यादरम्यान, नव्याने निऑन कलरचा लेहेंगा घातला आहे
रणधीर कपूरही रणबीर-आलियाच्या लग्नासाठी 'वास्तू'मध्ये पोहोचले आहेत.