Ranbir Kapoor-Alia Bhatt: प्रेग्नेंट आलिया भटला सांभाळताना दिसला रणबीर कपूर, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 04:17 PM2022-08-06T16:17:24+5:302022-08-06T16:44:40+5:30

Ranbir Kapoor-Alia Bhatt Photos : लग्नानंतर आलिया भट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसले. यादरम्यान रणबीर आलियाची पूर्ण काळजी घेताना दिसला.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) दोघेही लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र स्पॉट झाले होते. लवकरच ते आई बाबा होणार आहेत. आलिया आणि रणबीर एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती.

निमित्त होते ब्रह्मास्त्रचे नवीन गाणे लाँच करण्याचे. त्यामुळे रणबीर आणि आलिया एकत्र दिसले. यावेळी आलियाने बेबी बंप फ्लॉन्ट केला.

आतापर्यंत आलिया प्रत्येक इव्हेंटमध्ये लूज ड्रेसमध्ये बेबी बंप लपवताना दिसली होती, पण आज आलिया टाइट फिटिंग वन पीस ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूपच स्टाईलमध्ये दिसली, तर रणबीर कपूर काळ्या पॅंट आणि टी-शर्टमध्ये छान दिसत होता.

चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी या दोघांसोबत दिसला होता, जो त्यांचा खूप चांगला मित्रही आहे.

यादरम्यान रणबीरही आलियाला सांभाळताना दिसला. हाय हिल्स घालून आलियाने रणबीरसोबत रोमँटिक पोज दिल्या, त्यानंतर या फोटोंना खूप पसंती दिली जात आहे.

तसेच आलियाने या आउटफिटमधील फोटोशूटदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये आलियाचे बेबी बंप आणि प्रेग्नेंसी ग्लो दिसत आहे.

आलिया भटने जूनमध्येच तिच्या प्रेग्नेंसीची पुष्टी केली होती. त्यावेळी ती युरोपमध्ये असताना रणबीरही त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. पण आता तो त्याच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पूर्ण वेळ देत आहे. चित्रपटाचा ट्रेलर, गाणे रिलीज झाले आहे.