'हा तर केबलवाला'; रणबीर कपूरच्या नव्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 02:55 PM2022-03-06T14:55:18+5:302022-03-06T14:58:53+5:30

Ranbir kapoor: तरुणींमध्ये रणबीरची कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे या रॉकस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचा प्रयत्न करत असतात.

बॉलिवूडचा हँडसम हंक, चॉकलेट बॉय अशा कितीतरी नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर(Ranbir Kapoor). उत्तम अभिनयासोबतच गूड लुकिंगमुळे रणबीर कायम चर्चेत असतो.

तरुणींमध्ये रणबीरची कमालीची क्रेझ आहे. त्यामुळे या रॉकस्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते कमालीचा प्रयत्न करत असतात.

सध्या सोशल मीडियावर रणबीरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. यात त्याने लूक चेंज केल्याचं दिसून येत आहे.

रणबीरच्या एका फॅनपेजवर त्याच्या नव्या लूकचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

वांद्र्यातील धर्मा प्रोडक्शन ऑफिसच्या बाहेर रणबीरला स्पॉट करण्यात आलं असून सोशल मीडियावर त्याची कमालीची चर्चा आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये त्याने बिअर्ड लूक केला आहे. सोबतच व्हाइट शर्टावर ब्लू डेनिम जॅकेट आहे. या लूकमध्ये तो जरी कुल वाटत असला तरीदेखील अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

'अरे हा तर केबलवाला आहे', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'हा अवतार एकदम भिकाऱ्यासारखा केलाय', असंही काही जणांनी म्हटलं आहे.

रणबीर लवकरच 'ब्रह्मास्त्र' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट स्क्रीन शेअर करणार आहे.

ब्रह्मास्त्र ती पार्टमध्ये रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यात पहिला पार्ट ९ सप्टेंबर २०२२ मध्ये रिलीज होईल.