Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:31 PM2024-09-27T17:31:27+5:302024-09-27T17:58:50+5:30

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

'रॉकस्टार', 'ॲनिमल' सारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांतून रणबीर कपूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज या अभिनेत्याचे नाव इंडस्ट्रीतील टॉप आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत दिसते.

रणबीरचे असंख्य चाहते आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की रणबीर कपूरचा पहिला पगार फक्त २५० रुपये होता. त्याने त्याचा पहिला पगार आई नीतू कपूर यांना दिला होता.

Mashable India ला दिलेल्या मुलाखतीत रणबीर कपूरने त्याच्या पहिल्या पगाराचा खुलासा केला होता. अभिनेत्याने सांगितलं होतं की, जेव्हा त्याने 'प्रेम ग्रंथ' केला तेव्हा त्याला पहिला पगार मिळाला.

रणबीरने खुलासा केला की, जेव्हा त्याला पहिला पगार मिळाला तेव्हा तो खूप खूश होता आणि त्याने लगेच तो घेतला आणि त्याची आई नीतू कपूर यांना दिला. हे पाहून त्या खूप भावूक झाल्या.

'प्रेम ग्रंथ' हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचं दिग्दर्शन रणबीरचे काका राजीव कपूर यांनी केलं होतं. रणबीरने या चित्रपटात काम केलं नव्हतं तर काकांना असिस्ट केलं आहे.

राजीव कपूरला मदत केल्याबद्दल रणबीर कपूरला २५० रुपये पगार मिळाला. पगार मिळाल्यानंतर त्याने थेट आईकडे जाऊन पैसे दिले. हे पाहून आई खूप भावूक झाली आणि रडू लागली.

रणबीर कपूरचं त्याची आई नीतू कपूरसोबत खूप घट्ट नातं आहे. अभिनेता आईवर खूप प्रेम करतो. रणबीर संदीप रेड्डी वंगा यांच्या 'ॲनिमल'मध्ये दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक मोठे रेकॉर्ड मोडले.

या चित्रपटासाठी रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर ट्रॉफीही मिळाली. लवकरच हा अभिनेता नितेश तिवारी यांच्या 'रामायण'मध्ये आणि संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार आहे.

रणबीर सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तो नेहमीच त्याचे जबरदस्त फोटो शेअर करत असतो.