ranbir-kapoor-madhuri-dixit-karisma-kapoor-still-felt-regretted-doing-kissing-scene
माधुरी दीक्षित ते इम्रान हाश्मी! 'या' 5 कलाकारांना किसिंग सीन दिल्याचा होतोय पश्चाताप By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:00 PM2023-08-29T16:00:15+5:302023-08-29T16:13:11+5:30Join usJoin usNext Bollywood celebs: करिश्मा कपूर - बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या करिश्मा कपूरने राजा हिंदुस्तानी या सिनेमा किसिंग सीन दिला होता. अभिनेता आमिर खानसोबत हा सीन शूट झाला होता. मात्र, हा सीन केल्याचा आजही करिश्माला पश्चाताप होतो. या सीनचं तीन दिवस शुटिंग सुरु होतं. कंगना रणौत - अभिनयशैलीसह स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना रणौत हिनेदेखील एका सिनेमात किसिंग सीन दिला आहे. शाहिद कपूर याच्यासोबत कंगनाने रंगून या सिनेमात किसिंग सीन दिला होता. एका मुलाखतीमध्ये तिने हा सीन करताना भयानक अनुभव आल्याचं म्हटलं होतं. रणबीर कपूर- बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून रणबीर कपूरकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे आजवर रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. जग्गा जासूस या सिनेमात रणबीरने कतरिना कैफसोबत किसिंग सीन दिला होता. परंतु, हा सीन त्यांच्या ब्रेकअपनंतर शूट झाला होता. त्यामुळे हा सीन केल्याचा त्याला आजही पश्चाताप होतो. माधुरी दीक्षित - बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने वयाच्या २० व्या वर्षी पहिला किसिंग सीन दिला होता. हा सीन करताना माधुरी प्रचंड रडली होती. दयावान या सिनेमात तिने किसिंग सीन दिला होता. हा सीन केल्यानंतर तिला बराच पश्चाताप झाला होता. इम्रान हाश्मी- सीरियल किसर म्हणून इम्रान हाश्मीकडे पाहिलं जातं. मात्र, मर्डर सिनेमात त्याने दिलेल्या किसिंग सीनचा त्याला आजही पश्चाताप होतो. या सिनेमात किसिंग सीन शूट करत असताना त्याला प्रचंड विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं.टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमामाधुरी दिक्षितकरिश्मा कपूररणबीर कपूरbollywoodCelebritycinemaMadhuri DixitKarisma KapoorRanbir Kapoor