'हे' आगामी ५ बॉलिवूड चित्रपट मोडू शकतात 'पुष्पा २'चा बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:51 IST2025-01-15T16:21:07+5:302025-01-15T16:51:06+5:30
'हे' आगामी ५ बॉलिवूड 'पुष्पा २'चा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडू शकतात.

सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडित काढले.
'पुष्पा २' भारतातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. १ हजार ८३१ कोटींचा गल्ला या सिनेमानं जमवला आहे. 'बाहुबली: २' सिनेमानं भारतात १ हजार ७०० कोटी कमावले होते.
'पुष्पा'भाऊचा रेकॉर्ड कोण मोडणार? असा प्रश्न आहे. पण, आगामी काळात असे पाच सिनेमे प्रदर्शित होणार आहेत, जे 'पुष्पा २'चा रेकॉर्ड मोडू (5 Upcoming Films That May Beat Pushpa 2) शकतात.
या यादीत पहिला चित्रपट आहे 'रामायण'. नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या (Ranbir Kapoors Raamayan Movie ) भूमिकेत आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणजे 'बॉर्डर २' (Border 2). १९९७ साली प्रदर्शित झालेल्या 'बॉर्डर' सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. 'बॉर्डर २' हा चित्रपट अनुराग सिंग दिग्दर्शित करणार आहेत. 'बॉर्डर २' हा 'पुष्पा २' च्या विक्रमी कमाईला मागे टाकू शकतो.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ॲनिमलच्या यशानंतर आता या सिनेमाचा दुसरा भाग 'ॲनिमल पार्क' (Animal Park) येणार आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार यात शंका नाही.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्याची लाडकी लेक सुहाना खान यांचा 'किंग' (King)हा सिनेमा येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख, सुहाना शिवाय यात अभिषेक बच्चन याचीदेखील प्रमुख भूमिका आहे.
सलमान खान (Salman Khan ) ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित 'सिकंदर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपुर्वी 'सिकंदर' (Sikandar On Eid 2025)चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. हा टीझर ब्लॉकबस्टर ठरला. त्यामुळे 'सिकंदर'ची क्रेझ पाहता बॉलिवूडचा भाईजान 'पुष्पा २'चा कमाईचा विक्रम मोडू शकतो.