रणवीर सिंगची भन्नाट स्टाईल; फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 03:10 PM2023-09-07T15:10:41+5:302023-09-07T15:23:02+5:30

अभिनेता रणवीर सिंग आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो.

अभिनेता रणवीर सिंगची एनर्जाटिक बॉय म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत.

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याने नवीन फोटोशूट केले असून टॉम फोर्ड नेव्ही वेलवेट सूटमधील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रणवीर सिंग हा बॉलीवूडमधील सर्वात हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनेत्याला मोठ्या प्रमाणावर फॅन फॉलोइंग आहे.

काही महिन्यांपूर्वी रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटो समोर येताच कमालीचे व्हायरल झाले होते. रणवीरने एका मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. त्याचे हे फोटोशूट काहींना आवडले, तर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला.

नुकतेच रणवीर सिंग हा आलिया भट्टसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये दिसला आहे. हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केलायं.

डॉन सिनेमाचा तिसरा भाग येणार आहे. यावेळी डॉनच्या भूमिकेत रणवीर दिसणार आहे. या चित्रपटातून रणवीर सिंग त्याच्या डॅशिंग लूक, भरमसाठ टॅलेंट आणि संस्मरणीय परफॉर्मन्समध्ये परतणार आहे.

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो, गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.