रणवीर सिंगचा लूक पाहून चाहते झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 19:51 IST2019-04-24T19:49:38+5:302019-04-24T19:51:55+5:30

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच तो वांद्रे येथे एकदा डिसेंट लूकमध्ये दिसला होता.
रणवीर सिंग सध्या आगामी चित्रपट ८३साठी खूप मेहनत करतो आहे.
८३ चित्रपटात रणवीर माजी क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे.
८३ चित्रपट २०२०मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात रणवीर सिंग सोबत साकिब सलीम, एमी वर्क, साहिल खट्टर, चिराग पाटिल आणि हार्डी संधू यासारखे कलाकार दिसणार आहेत.
नुकताच रणवीर गली बॉय चित्रपटात रॅपरच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.
गली बॉयमध्ये रणवीर सोबत आलिया भट मुख्य भूमिकेत होती.
गली बॉयच्या आधी रणवीर सिम्बा चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती.