३० वर्ष मुलासाठी अभिनेत्रीने सहन केला पतिचा अत्याचार; करिअरच्या शिखरावर सोडली इंडस्ट्री, आता जगतेय असं आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 04:18 PM 2023-05-17T16:18:37+5:30 2023-05-17T18:04:12+5:30
वर्षानुवर्षे सर्वांना वाटत होते की अभिनेत्री तिच्या मुला आणि पतीसोबत खूप आनंदी आयुष्य जगते आहे, परंतु 2015 मध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील सत्य उघड केलं. बॉलिवूड अभिनत्री रती अग्निहोत्री (Rati Agnihotri) यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. या अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीत 70 आणि 80 च्या दशकातील सर्व टॉपच्या कलाकारांसोबत काम केले आहे. रती अग्निहोत्रीने अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, कमल हासन आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या सुपरस्टार्ससोबत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
हिंदी चित्रपटात पाऊल ठेवण्यापूर्वी रती यांनी साऊथ चित्रपटांमध्ये आपले नाणे जमवले होते. या अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही.
रती अग्निहोत्री यांचं ऑनस्क्रिन आयुष्य जितके यशस्वी होते तितकेच तिचे ऑफस्क्रीन आयुष्य अडचणींनी भरलेले होते. रती यांच्या वैयक्तिक आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते.
रती आणि संजय दत्त यांच्या रिलेशनशीपची खूप चर्चा झाली होती. असे म्हटले जाते की दोघांची एकमेकांनावर खूप प्रेम होते आणि त्यांना लग्न करायचे होते, परंतु संजय दत्तच्या व्यसनामुळे अभिनेत्रीच्या वडिलांनी या नात्याला नाकार दिला.संजय दत्तसोबत ब्रेकअप झाल्यानंतर रती यांनी पूर्ण लक्ष तिच्या करिअरवर केंद्रित केले आणि ती एकापाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देत होत्या.
1981 साली रती यांचा ‘एक दुजे के लिये’ हा सिनेमा रिलीज झाला आणि एका रात्रीत स्टार झाल्या. याचदरम्यान रती यांची ओळख बिझनेसमन अनिल विरवानीसोबत झाली. रती आणि अनिल यांच्या लग्नाला कुटुंबाकडून विरोध होता. मात्र, तरीदेखील कुटुंबाचा विरोध झुगारून त्यांनी ९ फेब्रुवारी १९८५ मध्ये लग्नगाठ बांधली.
अनिल विरवानीसोबत लग्नगाठ बांधताना अभिनेत्रीने स्वप्नातही विचार केला नसेल की हे लग्न तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरेल. लग्नानंतर अभिनेत्रीने चित्रपटांमधून बराच ब्रेक घेतला. वर्षानुवर्षे सर्वांना वाटत होते की अभिनेत्री तिच्या मुला आणि पतीसोबत खूप आनंदी आहे, परंतु 2015 मध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील सत्य उघड केले.
लग्नानंतर 30 वर्षे रती चित्रपटांपासून दूर राहिली. 2015 मध्ये पतीपासून घटस्फोट घेत असताना अभिनेत्रीने धक्कादायक खुलासे केले होते. तिने सांगितले होते की, नवऱ्याकडून शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. "३० वर्ष मी पतीकडून होणारा त्रास सहन केला. हा त्रास मी केवळ माझ्या मुलासाठी सहन करत होते. माझ्या मुलावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ नये यासाठीच मी गप्प होते. परंतु, ज्यावेळी माझ्या मुलाला सगळं कळू लागलं त्यावेळी मी पतीविरोधात तक्रार करायचं पाऊल उचललं", असं रती म्हणाल्या.
रती अग्निहोत्री यांना पतीपासून वेगळे होऊन आता बरीच वर्षे उलटून गेली आहेत आणि आज त्या आपल्या मुलासोबत आनंदी जीवन जगत आहेत.
रती अग्निहोत्री यांचा मुलगा तनुज विरवानी हा देखील अभिनेता आहे आणि तो जेनिफर विंगेटसोबत 'कोड एम' या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. यातील तनुजच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.