म्हणून आयशा झुल्काला व्हायचे नव्हते आई, लग्नाच्या १७ वर्षानंतर केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 04:38 PM 2021-03-26T16:38:56+5:30 2021-03-26T16:43:36+5:30
Ayesha Jhulka Personal Life Unknown Facts: 2018 साली आयशा जुल्काने कमबॅक केले होते. पण तो सिनेमा कधी आला आणि कधी गेला हेच कळाले नाही. एका मुलाखतीत आयशाने तिच्या करिअरपासून ते पर्सनल लाईफबद्दलही अनेक खुलासे केले होते. 90 च्या दशकातील बॉलिवूडची आघाडीची आणि देखणी अभिनेत्री आयशा जुल्का, बॉलिवूडची सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
बॉलिवूडच नाही तर तेलूगू, बंगाली आणि उडिया भाषेतील सिनेमातही तिने काम केले आहे.
लग्नानंतर आयशा बॉलिवूडपासून दूर गेली आणि संसारात रमली असे तुम्हाला वाटत असेल.
लग्नानंतर आयशा बॉलिवूडपासून दूर गेली पण तिने समाजकार्यांत स्वतःला झोकून दिले.
बॉलिवूडमध्ये काम करण्यापेक्षा समाजकार्यात तिचे मनं जास्त रमू लागले होते.
इतकेच काय तर लग्नानंतरही तिने आई न बनण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला होता.
विशेष म्हणजे निर्णय कुटुंबानेही तिचा हा निर्णय मान्य केला होता.
पतीनेही मला समजून घेतले. माझा पती समीर एक समजूतदार व्यक्ति असल्याचे तिने सांगितले होते.
पतीसोबत कंस्ट्रक्शन, स्पा आणि स्वत:ची क्लोदिंग लाईन असा सगळा व्याप आयशा सांभाळते.