Mugdha Godse राहुल देवसोबत राहते लिव्ह-इनमध्ये, लग्नाबद्दल केला मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 07:53 PM 2021-04-14T19:53:09+5:30 2021-04-14T20:00:06+5:30
Mugdha Godse Reveals Marriage Plans: अभिनेत्री मुग्धा गोडसे. मधुर भंडारकर दिग्दर्शित 'फॅशन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांपासून राहुल देवसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत असायची आता पुन्हा त्याच काणामुळे चर्चेत आली आहे. मधुर भांडारकच्या 'फॅशन' सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे सध्या चित्रपटांपासून दूर आहे.
ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
मुग्धाने पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे.
तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असलेल्या राहुल देवला ती डेट करते आहे.
या दोघांच्या घरच्यांनाही यांचे नाते मान्य असून ते कधी लग्न करणार याविषयी सध्या चर्चा सुरु आहे.
राहुलसोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही.
केवळ लग्न केल्यामुळे आमचे नात्याला आम्ही कागदोपत्री जाहीर करण्यापेक्षी लिव्ह इन मध्ये राहून आमचे नाते अधिक घट्ट झाले आहे.
त्यामुळे आमच्या नात्याला लग्नाची तशीही गरज नाही. तसेच सध्या लग्नाचा विचार केला नसून जेव्हा व्हायचे असेल तेव्हा लग्न होईल" असे तिने सांगितले.
राहुल आणि मुग्धा नेहमी एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. मुग्धाच्या इन्सटाग्रामवर नजर टाकली असता तिचे अकाउंट राहुलसोबतच्या फोटोंनी भरलेले आहे.