"मला मंदिरात जाण्याची गरज नाही कारण...", रेखाच्या आलिशान बंगल्याची आहे खास बात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 03:18 PM2024-12-04T15:18:22+5:302024-12-04T15:26:58+5:30

अभिनेत्रीचा रेखाचा आलिशान बंगला कुठे आहे?

सदाबहार अभिनेत्री रेखा (Rekha) कायम चर्चेत असते. वयाच्या ७० व्या वर्षीही रेखाच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत. सुंदर साड्यांचं कलेक्शन, चेहऱ्यावर तोच ग्लो असाच कायम त्यांचा लूक असतो.

पण रेखाच्या मुंबईतील बंगल्याविषयीची माहिती तुम्हाला आहे का? जिथे शाहरुख-सलमानचं घर आहे त्याच बांद्रा बँडस्टँड येथे रेखाचाही आशियाना आहे.

रेखाच्या आलिशान घराचं नाव 'पुष्पावल्ली' आहे. हे नाव रेखाच्या आईचं असून त्यांच्याच नावावर ठेवण्यात आलं आहे. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर रेखाने हा बंगला खरेदी केला.

रेखा आईसोबत मुंबईत आली तेव्हा दोघी हॉटेलमध्ये राहत होत्या. यानंतर भाड्याच्या घरात राहिल्या. मात्र मुंबईत आपलं स्वत:चं घर असावं असं त्यांना वाटत होतं.

८० च्या दशकात बांद्रा मध्ये त्यांनी घर खरेदी केलं. तेव्हा रेखा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, "माझं घर मला मंदिरासमान आहे. मला कोणत्या मंदिरात जाण्याची गरज नाही कारण माझं घरच मंदिर आहे."

रेखा आजही याच घरात वास्तव्यास आहे. बंगल्यात एकाही पापाराझींचा कॅमेराही पोहोचलेला नाही. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालत रेखा यांनी हा बंगला सजवला आहे.

रेखा यांच्या आई विवाहित अभिनेता रामास्वामी गणेशन यांच्या प्रेमात होत्या. अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना अभिनेत्यासोबत संसार थाटता आला नाही. मात्र या नात्यातून त्यांना पहिली मुलगी झाली जितं नाव भानुरेखा गणेशन. आज हीच रेखा नावाने जगभरात प्रसिद्ध आहे.