सासरी गेलेल्या रेखासोबत घडली होती ‘ही’ विचित्र घटना, त्यानंतर कधीच केला नाही लग्नाचा विचार By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 07:22 PM 2021-04-13T19:22:35+5:30 2021-04-13T19:31:45+5:30
The Love Life Of Rekha: गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत आपला अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि मादक तसंच घायाळ करणा-या अदांमुळे रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे रेखा. त्यांच्या अभिनयावर आजही सारेच फिदा आहेत. त्यामुळेच की काय बॉलीवुड दिवा म्हणून त्यांची ओळख आहे. रेखा यांचं व्यावसायिक जीवन जितकं गाजलं तितकंच त्याचं खासगी जीवन वादग्रस्त ठरलं.
त्यांच्या खासगी जीवनाविषयी कुणालाच फारसं माहित नाही.
प्रत्येकाकडे रेखा यांच्या खासगी जीवनाविषयी उलटसुलट माहिती आहे.
रेखा आणि विनोद मेहरा यांनी ब-याच सिनेमात एकत्र काम केलं.
काम करता करता दोघांमध्ये एक प्रेमाचं नातं निर्माण झालं.
दोघंही लग्नबंधनात अडकले.मात्र विनोद मेहरा यांच्या मनातील पत्नी रेखा बनू शकल्या नाही.
इतकंच नाही तर विनोद मेहरा यांच्या मातोश्रींनाही रेखा सून म्हणून मान्य नव्हत्या.
लग्न करुन नववधू बनलेली रेखा विनोद मेहरा यांच्या घरी पोहचली.
विनोद मेहरा यांच्या आईने रेखाला आपली सून मानण्यास आणि गृहप्रवेश देण्यास नकार दिला.
नववधूच्या रुपात आलेल्या रेखा यांना घराची एक पायरीही चढता आली नव्हती असं त्यावेळी बोललं गेलं.
त्यावेळी आई आणि पत्नी यापैकी एकाची निवड करण्यास रेखा यांनी विनोद मेहरा यांना सांगितलं.
त्यावेळी विनोद मेहरा यांनी प्रेमाऐवजी आपल्या आईला निवडलं होतं.
यामुळेच रेखा यांच्या आयुष्यातून विनोद मेहरा निघून गेले होते.
या घटनेनंतर त्यांनी कधीच लग्न न करण्याचाच निर्णय घेतल्याचे बोलले जाते.