'मुन्नाभाई MBBS' मधला स्वामी आठवतोय ना!, आता त्याला ओळखणं झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 10:37 AM2024-07-24T10:37:56+5:302024-07-24T10:47:59+5:30

Munnabhai MBBS Movie : २००३ मध्ये रिलीज झालेला संजय दत्तचा कॉमेडी ड्रामा फिल्म 'मुन्नाभाई एमबीबीएस' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा असा सदाबहार चित्रपट आहे, जो आजही लोकांना पाहायला आवडतो. या चित्रपटातील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटात 'स्वामी' ही व्यक्तिरेखा खुर्शीद लॉयर याने साकारली होती.

२००३ मध्ये रिलीज झालेला संजय दत्तचा कॉमेडी ड्रामा फिल्म 'मुन्नाभाई एमबीबीएस' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. हा असा सदाबहार चित्रपट आहे, जो आजही लोकांना पाहायला आवडतो. या चित्रपटातील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.

या चित्रपटात 'स्वामी' ही व्यक्तिरेखा खुर्शीद लॉयर याने साकारली होती. या चित्रपटात बारीक दिसणाऱ्या खुर्शीद लायरचा लूक पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे.

काही काळापूर्वी विरल भयानीचे काही फोटो त्याच्या अधिकृत इन्स्टा पेजवर शेअर केले होते, जे पाहून लोक त्याला ओळखू शकले नाहीत.

विरल भयानी यांच्या पेजवरून खुर्शीदचा फोटो शेअर करताना त्यांच्याबद्दलची माहितीही देण्यात आली आहे. फोटो शेअर करताना लिहिले आहे की, "खुर्शीद लॉयरने ४ वर्षांनी तिग्मांशू धुलियाच्या द ग्रेट इंडियन मर्डर ऑन हॉटस्टारमधून पुनरागमन केले आहे.

तो अजूनही मुन्नाभाई एमबीबीएसमधील स्वामीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे आणि तो अजब प्रेम की गजब कहानी, प्यारे मोहन, डबल धमाल, बुढा मार गया या चित्रपटांमध्ये तो दिसला होता. त्याचे चाहते आगामी प्रोजेक्टची नक्कीच वाट पाहत आहेत.

हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिल्या आणि आता पुन्हा एकदा ही पोस्ट चर्चेत आली आहे.

एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे की, "स्वामीची भूमिका छान होती."

काही युजर्स कमेंट सेक्शनमध्ये मुन्ना आणि स्वामीचे डायलॉग लिहितानाही दिसले.