Rhea Chakraborty : "नकारात्मक गोष्टी..." सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीची वाईट अवस्था, आमिरसमोर मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 03:38 PM2024-08-27T15:38:14+5:302024-08-27T16:05:52+5:30

Rhea Chakraborty : आमिर खानसोबतच्या संभाषणात रिया चक्रवर्ती मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि टीका यावर बोलली आहे.

रिया चक्रवर्ती सध्या 'चॅप्टर २' पॉडकास्टमुळे चर्चेत आहे. पहिल्या एपिसोडमध्ये तिने सुष्मिता सेनशी संवाद साधला, ज्यामध्ये सुष्मिताने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं.

आमिर खान दुसऱ्या एपिसोडमध्ये सहभागी झाला आणि त्याने अशा अनेक गोष्टी शेअर केल्या ज्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या पॉडकास्मधून रियाने कमबॅक केलं आहे.

२०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. ड्रग्ज विकत घेऊन सुशांतला दिल्याचाही आरोप रियावर होता. इतकंच नाही तर अभिनेत्री २८ दिवस पोलीस कोठडीत होती.

आजही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते आणि तिच्या बहुतेक पोस्टवर युजर्स 'जस्टिस ऑन सुशांत' असं लिहितात. या घटनेनंतर तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे.

आमिर खानसोबतच्या संभाषणात रिया चक्रवर्ती मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि टीका यावर बोलली आहे. याच दरम्यान, आमिरने अभिनेत्रीच्या धाडसाचं कौतुक करत म्हटलं की, इतक्या कठीण परिस्थितीतही रियाने खूप धैर्य दाखवलं.

आमिरने सांगितलं की, रियाने प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना केला. 'तुझ्यासोबत जे काही झाले, त्याला मी शोकांतिका म्हणेन', असेही तो म्हणालो. रिया चक्रवर्ती म्हणाली, "चॅप्टर २ सुरू व्हायला मला इतका वेळ लागला कारण मी स्वतःला बरं करत होती."

"या काळात, मला खूप दुःख, चिंता, PTSD, मानसिक आरोग्याविषयक समस्या आणि बरंच काही याचा सामना करावा लागला. कधी-कधी दुःख इतकं मोठं होतं की तुम्ही कोणाशी तरी बोलत असता आणि अचानक तुम्ही त्यातच बुडता."

"खूप नकारात्मक गोष्टी होत्या, पण आता मला नवी ऊर्जा मिळाली आहे. जेव्हा डिप्रेशन तुमच्या मनावर ताबा मिळवतो, तेव्हा त्यातून बाहेर पडणं अवघड असतं, पण आता मला बरं वाटतं आहे आणि मला नवीन गोष्टी करण्याची इच्छा आहे."

रियाच्या हिमतीचं कौतुक करताना आमिर म्हणतो, "तुझं आयुष्य ज्या पद्धतीने बदललं, तू किती हिंमत आणि संयम दाखवलास, त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. यातून आपण सर्वजण खूप काही शिकू शकतो."

"माणसाचे मनोबल बिघडतं आणि तो चिरडला जातो. तू तुझा दुसरा चॅप्टर सुरू करत आहेस. ही खूप चांगली आणि धाडसी गोष्ट आहे." रिया सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे फोटो शेअर करत असते.