रिया कपूरच्या लग्नात भाव खाऊन गेली ‘ती’, बोल्ड लूकने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:57 PM2021-08-16T17:57:31+5:302021-08-16T18:17:15+5:30

बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सतत चर्चेत असतात.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूरने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

याच यादीत आता आणखी नव्या नावाच भर पडली आहे. हे नाव म्हणजे खुशी कपूर. जान्हवीची बहिण खुशी सध्या चर्चेत आहे.

बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नसलेली खुशीने रिया कपूरच्या लग्नासोहळ्यात अचानक साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.

रियाच्या लग्न सोहळ्यात खुशीचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.

लग्नसोहळ्यात खुशी अतिशय ग्लॅमरस अंदाजात अवतरली होती. तिचा अंदाज जितका ग्लॅमरस तितकाच बोल्डही होता.

खुशीने लग्नात पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. लेहंग्यावर अतिशय सुंदर डिझाइन केलेला ब्लाउजमुळे संपूर्ण लुकमध्ये बोल्डनेस लूक आला होता.

या ड्रेसला साजेसे अशी ज्वेलरीही तिने यावेळी घातली होती. सिंम्पल एंड सोबर लूकमध्ये खुशीच्या सौंदर्यात अंधिकच भर पडली.

लूकच्या बाबतीत उपस्थितांमध्ये खुशी अतिशय आकर्षक दिसत होती. तिचे हे फोटो समोर येताच चाहतेही तिच्या सौंदर्यांचे कौतुक करताना दिसत आहेत.

तिचा हा अंदाज, अदा आणि सौंदर्य पाहून खुशी कपूरही लवकरच बॉलीवुडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.