रिचा चड्ढाचं मॅटर्निटी फोटोशूट, बिनधास्तपणे फ्लॉन्ट केला बेबी बंप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 08:45 AM2024-07-17T08:45:41+5:302024-07-17T08:48:12+5:30

काही दिवसांपूर्वीच रिचा चड्ढा आणि अली फजलने सोशल मीडियावरुन गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता रिचाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.

रिचा चड्ढा आणि अली फजल ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. रिचा आणि अली लवकरच आईबाबा होणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आता रिचाने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.

याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या मॅटर्निटी फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रिचाने शर्टमध्ये तिचा बेबी बंप फ्लाँट केला आहे. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंन्सी ग्लोदेखील पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीने अगदी साध्या वेशात हे मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

रिचा आणि अलीने २०२२ मध्ये अगदी साध्या पद्धतीने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. आंतरधर्मीय विवाहामुळे त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं.

लग्नानंतर दोन वर्षांनी आता त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आईबाबा होण्यासाठी ते दोघेही उत्सुक आहेत.