PHOTOS : मेहंदी की रात...! अशी सजली होती रिचा चड्ढा, अली फजलसोबत दिल्या नॉटी पोझ By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 04:09 PM 2022-10-12T16:09:07+5:30 2022-10-12T16:15:46+5:30
Richa Chadha Ali Fazal : रिचा चड्ढा व अली फजल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दिल्लीत दोघांचं थाटात लग्न झालं. आता लग्नाच्या काही दिवसानंतर रिचाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत. रिचा चड्ढा व अली फजल नुकतेच लग्नबंधनात अडकले. दिल्लीत दोघांचं थाटात लग्न झालं. आता लग्नाच्या काही दिवसानंतर रिचाने मेहंदीचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत रिचा कमालीची सुंदर दिसतेय. हातावर सजलेली अलीच्या नावाची मेहंदी ती फ्लॉन्ट करताना दिसतेय.
मेहंदी सोहळ्यासाठी रिचाने ग्रीन कलरचा लहंगा निवडला होता. त्यावर स्टायलिश पोनी आणि हेवी ज्वेलरी असा तिचा लुक होता.
मेहंदी सेलिब्रेशनदरम्यान रिचा अलीसोबत नॉटी पोझ देताना दिसली. दोघंही एकमेकांत हरवलेले दिसले.
रिचाच्या मेहंदीसाठी राजस्थानातून पाच आर्टिस्ट बोलवले होते. रिचाच्या हातावर काढण्यात आलेल्या मेहंदीमध्ये अलीचं नाव होतं. तिच्या दोन लाडक्या मांजरींचे स्केच होतं.
रिचा आणि अली हे दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली.
अखेर 6 ऑक्टोबरला रिचा व अलीचं लग्न पार पडलं. 2 ऑक्टोबरपासून लग्नविधी सुरू झाले आणि 6 तारखेला दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या.
2012 मध्ये फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिली भेट झाली होती.
सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2019 मध्ये रिचा-अलीने साखरपुडा केला. फुकरे याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही रिचा व अली एकत्र झळकणार आहेत.