एका Video मुळे करियर उद्ध्वस्त, OTT वर चालली नाही जादू; अभिनेत्री बॉलिवूडपासूनही लांब By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 03:46 PM 2023-12-18T15:46:16+5:30 2023-12-18T16:06:23+5:30
एका मोठ्या घटनेनंतर तिचं करियर उद्ध्वस्त झालं आणि नंतर तिला बॉलिवूड सोडण्यास भाग पाडलं गेलं, तरीही अभिनेत्री इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनने लहानपणापासूनच अभिनयाला सुरुवात केली होती, तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे, परंतु एका मोठ्या घटनेनंतर तिचं करियर उद्ध्वस्त झालं आणि नंतर तिला बॉलिवूड सोडण्यास भाग पाडलं गेलं, तरीही अभिनेत्री इतर अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे.
हिंदी व्यतिरिक्त रिया सेन बंगाली, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसली आहे. वयाच्या 42 व्या वर्षीही ती सुंदर दिसते आणि तिचा फिटनेस पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही.
1998 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी फाल्गुनी पाठकच्या 'याद पिया की आने लगी' या म्युझिक व्हिडिओमध्ये रिया दिसली होती. त्यावेळी पहिल्यांदा मॉडेल म्हणून तिला ओळख मिळाली होती.
रिया तेव्हापासून ती अनेक चित्रपट, म्युझिक व्हिडिओ आणि फॅशन शोमध्ये दिसली आहे. रीना सेन राजघराण्यातील आहे. तिचे वडील भरत देव वर्मा त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत.
कूचबिहारच्या राजकुमारी इला देवी यांचा ते पुत्र आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचा भाचे होते. रीनाची आई मुनमुन सेन आणि आजी सुचित्रा सेन या देखील दिग्गज अभिनेत्री होत्या.
रियाने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली जेव्हा ती 5 वर्षांची होती, तिने पहिल्यांदा पडद्यावर लहान मुलीची भूमिका साकारली. नंतर 1991 मध्ये तिने 'विषकन्या' चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केलं.
2001 मध्ये एन चंद्रा दिग्दर्शित लो-बजेट कॉमेडी 'स्टाईल' मधून मुख्य अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर, तिने आणखी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात प्रामुख्याने 'झंकार बीट्स', 'दिल विल प्यार व्यार', 'कयामत' आणि 'अपना सपना मनी मनी' सारख्या चित्रपटांची नावे आहेत.
याच काळात रियाचे अफेअरही चर्चेत होते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, तिचे अक्षय खन्ना ते लेखक सलमान रुशदीपर्यंत अफेअर होते. रुशदी आणि रिया त्यांच्या नात्याबद्दल कधीच बोलले नसले तरी काही काळानंतर दोघेही वेगळे झाले.
रिया आणि अभिनेता अश्मित पटेल यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला होता. यावेळी दोघांचा एक एमएमएस लीक झाला, त्यानंतर अनेक वाद झाले. अभिनेत्रीचे करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि रियाला बॉलिवूडपासून दूर राहावे लागले,
मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी काही लोकांनी अभिनेत्रीवर आरोप केला होता की रियाने लक्ष वेधण्यासाठी जाणूनबुजून तो लीक केला होता, परंतु रिया आणि अश्मित दोघांनीही हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं होतं.
2016 ते 2019 पर्यंत, रिया 'अलिशा', 'रागिनी एमएमएस: रिटर्न', 'प्वॉयजन' आणि 'मिसमॅच 2' या चार वेब सीरिजमध्ये देखील दिसली होती, परंतु ओटीटीवरही तिची जादू चालू शकली नाही.