‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 16:24 IST2020-05-29T16:24:55+5:302020-05-29T16:24:55+5:30

‘एमटिव्ही रोडीज’ या शोमुळे लोकप्रिय झालेला रघु राम याची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. पण त्याचा बच्चा रिदम याची ओळख तर व्हायलाच हवी.

रिदमचे अनेक क्यूट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत रिदम त्याची आई नतालीसोबत दिसतोय.

रघुराम रिदमशी धम्माल मस्ती करतोय.

रघुराम व नताली दोघेही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या तरी त्यांच्या सोशल अकाऊंटवर केवळ चिमुकल्या रिदमचे फोटो दिसत आहेत.

रघु रामने डिसेंबर 2018 मध्ये नतालीसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर वर्षभरात हे कपल आई-बाबा झाल होते.

रघु राम व नताली 2011 पासून एकमेकांना डेट करत होते.

‘आंखों ही आंखों में’ या गाण्यात नताली व रघु यांनी एकत्र काम केले होते. याचदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 12 डिसेंबर 2018 रोजी दोघांनी दाक्षिणात्य पद्धतीने लग्न केले होते. या लग्नाला केवळ त्यांच्या घरातील जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी उपस्थित होते.