सैफची धाकटी बहीण आहे इतक्या कोटींची मालकीण, एका कारणामुळे वयाच्या ४५ व्या वर्षीही आहे अविवाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:17 IST2021-07-26T13:58:04+5:302021-07-26T14:17:05+5:30
पतौडी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. शर्मिला टागोर, सैफ अली खान, सोहा अली खान, करीना कपूर आणि आता सारा अली खान या सगळ्यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.

पतौडी कुटुंबातील एक सदस्य आहे ज्याचा बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत कोणताच संबंध नाही.
ही व्यक्ती म्हणजे सैफ अली खानची बहिण सबा अली खान. सबा सैफपेक्षा छोटी आणि सोहापेक्षा मोठी आहे.
कुटंबातील सगळचे सदस्य नेहमीच प्रकाशझोतात असतात पण सबाला मात्र चर्चेत राहणे आवडत नाही.
फॅमिली फंक्शनशिवाय ती कुठेच दिसत नाही.
बॉलिवूड आणि लाईमलाईटपासून दूर असलेली सबा २७०० कोटींची मालकीण आहे.
प्रोफेशनने ती ज्वेलरी डिझायनर आहे.तिचा स्वतःचा बिजनेस आहे.
सबाने तिची वहिनी करीनासाठी काही ज्वेलरी डिझाईन केल्या आहेत.
४२ वर्षीय सबाने आतापर्यंत लग्न केले नाही.
सबा पतौडी घराण्याच्या संपत्तीचा लेखाजोखा ठेवते.
बिझनेस व्यतिरिक्त नवाब कुटुंबाची कोटींच्या संपत्तीची देखरेख एकटी सबाच करते.