'ही' मराठमोळी बालकलाकार आहे आता टॉपची अभिनेत्री, सलमान खानसोबत केलंय काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:42 IST2025-04-02T16:24:57+5:302025-04-02T16:42:23+5:30

अभित्रीला कुटुंबीयांप्रमाणेच चित्रपटसृष्टीतच करिअर करायचं होतं आणि तिनं ते स्वप्न पुर्ण केलं.

कलाकारांचे लहानपणीचे फोटो नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. जे चाहत्यांना ओळखता देखील येत नाहीत. या फोटोत दिसणारी ही चिमुकली आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आहे.

मराठमोळी लेकीनं बॉलिवूडचा 'दबंग' खान सलमानसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

विशेष म्हणजे या अभिनेत्रीचे वडील हे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत.

जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर ही अभिनेत्री सई मांजरेकर (Saiee Manjrekar) आहे.

सई मांजरेकरनं २०१९ मध्ये 'दबंग ३' या सिनेमामधून बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.

बॉलिवूडसोबतच सईने तेलगू चित्रपटसृष्टीत देखील काम केलं आहे.

पण, तुम्हाला माहितेय सईचा पहिला चित्रपट हा 'दबंग ३' नव्हताच. 'दबंग ३' आधी तिनं एका मराठी चित्रपटामध्ये बाल कलाकार म्हणून काम केलं होतं.

बामहेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श या चित्रपटात सईने देखील काम केलं होतं. काकस्पर्श चित्रपटापासून तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

सई सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रीय असते. तिचे फोटो हे चाहत्यांना कायम भुरळ घालतात.