फोटोतील या मुलाला ओळखलंत का?, १२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी थाटला संसार, अन् मग अर्ध्यावरती मोडला डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 12:00 PM2023-08-16T12:00:20+5:302023-08-16T13:02:06+5:30

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर फिदा आहेत.

आवडत्या अभिनेता-अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो चाहते आनंदाने पाहतात. म्हणूनच रोज असे नवे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होतोय. हा फोटो आहे बॉलिवूडच्या एका लोकप्रिय सुपरस्टारचा.

फोटोतील या चिमुरड्याला तुम्ही ओळखलंत का? बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रीही त्याच्यावर लट्टू आहेत. अद्यापही तुम्ही त्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो.

हा चिमुकला दुसरा तिसरा कुणी नसून बॉलिवूडचा नवाब म्हटला जाणारा सैफ अली खान आहे. सैफ आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा आहे. सैफ अली खानचे वडील भोपाळच्या नवाबाचे होते.

सैफ अली खान सुरुवातीपासूनच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अमृता सिंगसोबतची त्याची लव्हस्टोरी तर कायम चर्चेचा विषय. त्यांच्या डेटिंगचे किस्से तर हैराण करणारे आहेत.

सैफ अली खानने 1993 मध्ये रिलीज झालेल्या 'परंपरा' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी आशिक आवारा, पेहचान, इम्तिहान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

सैफ आणि अमृताने 1991 साली लग्नगाठ बांधली. तेव्हा दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर होतं. सैफ फक्त २१ वर्षांचा होता तर अमृता ३३ वर्षांची होती. दोघांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुलंही झाली.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचे लग्न केवळ 10 वर्षे टिकले. यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आला.2004 साली सैफ आणि अमृताने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाची बातमी सिनेसृष्टीत वाऱ्यासारखी पसरली.

बहुचर्चित असलेल्या लव्हस्टोरीचा अंत झाला.. घटस्फोटानंतर सैफ अली खानला पोटगी म्हणून मोठी रक्कमही द्यावी लागली.

सैफ अली खान 2004 नंतर बराच काळ सिंगल राहिला. पण याच काळात सैफ अली खानची करीना कपूरसोबत मैत्री झाली. करीना कपूर आणि सैफ अली खान प्रेमात पडले.

यानंतर सैफ अली खानने 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं. सैफ आणि करीना कपूर यांनाही तैमूर आणि जेह अशी दोन मुले आहेत.