५ हजार कोटींची प्रॉपर्टी असून सैफ आहे कंगाल; 'या' कारणामुळे मुलांनाही देऊ शकत नाही संपत्तीमधील वाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 12:56 PM2022-08-16T12:56:40+5:302022-08-16T13:01:37+5:30

Saif ali khan: सूत्रांच्या माहितीनुसार, सैफ प्रत्येक महिन्याला ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान त्याच्या उत्तम अभिनयशैलीसह वैयक्तिक जीवनामुळेही कायम चर्चेत येत असतो.

चित्रपट, जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावणारा सैफ एका रॉयल कुटुंबातील असून त्याची वडिलोपार्जितदेखील मोठी संपत्ती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पटौदी पॅलेस आणि भोपाळमधील वडिलोपार्जित संपत्ती मिळून सैफ आज ५ हजार कोटी रुपयांचा मालक आहे.

५ हजार कोटी इतकी अमाप संपत्ती असूनही सैफ या प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकत नाही. इतकंच नाही तर या संपत्तीमधील कोणताही वाटा तो त्याच्या मुलांच्या नावे करु शकत नाही.

सैफची वडिलोपार्जित असलेली संपत्ती Enemy Property Act अंतर्गत येते. त्यामुळे या संपत्तीवर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही.

सैफचा पटौदी पॅलेस आणि भोपाळमधील प्रॉपर्टी Enemy Property Act अंतर्गत येते.

भोपाळचे नवाव हामिदुल्लाहखान यांना अबीदा सुल्तान आणि साजिदा सुल्तान या दोन लेकी होत्या. त्यामुळे कायदेशीररित्या हामिदुल्लाह खान यांच्या पश्चात अबीदा या संपत्तीची मालकीन होती. मात्र, १९५० मध्ये अबीदा सुल्तान पाकिस्तानामध्ये स्थायिक झाली.परंतु, हामिदुल्लाहव त्यांचे कुटुंबीय भारतातच होते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची वारसदार त्यांची धाकटी लेक साजिदाकडे सोपवण्यात आलं.

हामिदुल्लाह ब्रिटीश काळात नवाब होते. मात्र, त्यांनी त्याचं मृत्यूपत्र तयार केलं नव्हतं. म्हणूनच, या संपत्तीवरुन कुटुंबियांमध्ये वाद निर्माण झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अबीदाचे कुटुंबीय या संपत्तीवरुन वाद घालत आहेत.

सैफकडे वडिलोपार्जित संपत्ती जरी अमाप असली तरीदेखील तो दर महिन्याला स्वकष्टातून कोटयावधी पैसे कमावतो.

चित्रपट, जाहिराती, प्रॉफिट शेअर हा त्याच्या उत्पन्नाचा मुळ स्तोत्र आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सैफ प्रत्येक महिन्याला ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो.

एकट्या सैफची एकूण संपत्ती ११०० कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं.

सैफच्या कार कलेक्शन मध्ये बीएमडब्लू 7 सीरीज (BMW 7 Series), लेक्सस 470, फोर्ड मस्टांग, रेंज रोवर (Range Rover) आणि लँड क्रूजर (Land Cruiser) या गाड्यांचा समावेश आहे.